पनवेल : पनवेल महापालिकेने १८ जुलै रोजी सुरू केलेल्या शास्ती सवलतीच्या अभय योजनेला करदात्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या चार दिवसांत या योजनेच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत तब्बल १३ कोटी १६ लाख ३२ हजार ३१३ रुपयांचा कर जमा झाला आहे. तसेच, करदात्यांनी ५ कोटी ५८ लाख ८० हजार १२७ रुपयांची शास्ती सवलत मिळवली असल्याची माहिती महापालिका कर विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांनी दिली.

भाजपचे माजी नगरसेवकांनी १८ जुलै रोजी पालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासनाने १५ ऑगस्टपर्यंत कर भरल्यास ९० टक्के शास्ती सवलतीची अभय योजना जाहीर केली होती. या योजनेला करदात्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून चार दिवसात ४०७१ मालमत्ता धारकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे महापालिकेने सोमवारी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही योजना येत्या दोन महिन्यांसाठी विविध टप्यांमध्ये राबवली जाणार आहे. करदात्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्यास महापालिकेच्या थकीत करसंकलनात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास आयुक्त मंगेश चितळे यांनी व्यक्त केला आहे.