पनवेल : पनवेल तालुक्यामधील ग्रामीण व शहरीभागात निसर्ग संवर्धनासाठी रविवारी श्री सदस्यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही एक हजार वृक्षांचे रोपण पालेबुद्रुक गावालगतच्या डोंगराळ भागात करुन निसर्ग सेवेचे व्रत जोपासले आहे. शेकडो श्री सदस्यांनी वृक्षारोपणाच्या या मोहीमेत रविवारी हिरहिरीने सहभाग घेतला होता. 
|
महाराष्ट्र भूषण आणि जेष्ठ निरुपनकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्य स्मरणार्थ दरवर्षी अलिबाग येथील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्यावतीने निसर्ग संवर्धन केले जाते. मागील १२ वर्षात प्रतिष्ठानाच्यावतीने ११,३६० वृक्ष लावून त्यांचे संवर्धन श्री सदस्यांनी केले आहे.

हेही वाचा..अधीक्षकांच्या खांद्यावर तळोजा कारागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी प्रतिष्ठानाच्यावतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पालेबुद्रुक गावातील डोंगराळ जमिनीवर केलेल्या वृक्षारोपनामध्ये शेकडो श्री सदस्यांनी ज्या डोंगरावर वृक्ष घेऊन जाणे अशक्य आहे अशा ठिकाणी पावसात श्री सदस्यांनी भिजून वृक्ष घेऊन त्याचे रोपन केले. श्री सदस्यांच्या निसर्ग संवर्धन अभियानातील श्रमदानाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.