पनवेल : पनवेल रेल्वे स्थानकाच्या मालधक्का परिसरात २९ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. विकी गोपाल चंडालिया असे या मृत तरुणाचे नाव असून शहर पोलीस हत्येचे नेमके कारण काय याचा शोध घेत आहेत. विकी हा मजूर होता. विकीचे शव मंगळवारी पहाटे मालधक्का परिसरात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी गुन्हा नोंदवून मारेक-यांचा शोध सुरू केला. विकीचे कोणाशी वैर होते, का याची चौकशी पोलीस करत आहेत.