नवी मुंबई: शहरात पार्किंग समस्या गंभीर झाली असून पार्किंग वरून अनेक वाद हे नित्याचे झाले आहे. मात्र तुर्भे येथे रिक्षा पार्क करण्यावरून वाद एवढा विकोपाला गेले कि रिक्षा चालकाच्या पोटात स्क्रू ड्रायव्हरने वार केले गेले. त्यातच त्याचा मृत्यू झाला . या प्रकरणी रात्री उशिरा आरोपीला अटक केले आहे. 

दिनेश मौर्या असे यातील अटक आरोपीचे नाव आहे, तर मयत व्यक्तीचे नाव दिनेश चव्हाण आहे. आरोपी दिनेश मौर्या याचा व्यवसाय असून त्याचे दुकान शिवशक्ती नगर तुर्भे स्टोअर येथे आहे. बुधवारी सकाळी दिनेश चव्हाण यांनी आपली रिक्षा दिनेश मौर्या यांच्या दुकानासमोर लावली. दुकानासमोर रिक्षा लावल्याने सुरवातीला दोघात वाद झाला. मात्र दिनेश चव्हाण यांनी रिक्षा इतरत्र लावण्यास नकार दिल्याने दिनेश मौर्य याने दुकानातील स्क्रू ड्राइव्हर आणून दिनेश चव्हाण यांच्या पोटात अंगावर वार केले.

हेही वाचा >>> पनवेल: कासाडी नदीतील दूषित पाण्याने १५ बकऱ्या मृत्यूमुखी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिसरातील लोकांनी जखमी दिनेश चव्हाणला रुग्णालयात दाखल केले मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी एक पथक सदर ठिकाणी पाठवले. मात्र आरोपी पळून गेला होता. पोलिसांनी वेगवान तपास करून आरोपीला रात्री उशिरा अटक केले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.