पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात मागील दोन वर्षांपासून रस्त्याकडेला उभ्या केलेल्या मोटारीची काही क्षणात काच फोडून त्या मोटारीतील मुल्यवान ऐवज चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी रस्त्यावरील गुन्हे रोखण्याच्या खास सूचना पोलीसांना दिल्यामुळे पोलीस सुद्धा अशा विशिष्ट चोरीच्या पद्धतीकडे बारीक लक्ष्य ठेऊन होते. अखेर पनवेलच्या गुन्हे अन्वेषण विभाग कक्ष दोनच्या पोलीस पथकाने या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून १३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सहाय्यक आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी दिली. 

हेही वाचा >>> नवी मुंबई : विदेशी सफरचंद बाजारात दाखल, जाणून घ्या दर

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प

गुन्हे अन्वेषण विभाग कक्ष दोनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक उमेश गवळी व त्यांच्या पथकाला तांत्रिक माहितीच्या आधारे मंगळवारी (ता. १९) संबंधित चोरटे घणसोली येथे एका मैदानात मोटारीवर लक्ष्य ठेऊन असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथक सहाय्यक पोलीस निरिक्षख प्रविण फडतरे, उपनिरिक्षक मानसिंग पाटील, दिलीप भंडे, सुनिल गिरी, हवालदार मधुकर गडगे, तुकाराम सूर्यवंशी, रणजित पाटील, रमेश शिंदे, अनिल पाटील, अजित पाटील, निलेश पाटील, सागर रसाळ, दीपक डोंगरे, इंद्रजित कानू, रुपेश पाटील, राहुल पवार, जगदिश तांडेल, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, विक्रांत माळी, नंदकुमार ढगे, अमोल मोहीते, महिला पोलीस शिपाई अदिती काकडे यांनी सापळा रचला. पोलीसांनी याठिकाणी दोन संशयीत आरोपी आणि विना नंबर प्लेटची दुचाकी जप्त केली. अधिक चौकशी केल्यावर दोन संशय़ीत आरोपींनी चोरीच्या मुद्देमालातून सूझुकी कंपनीची सेलेरीओ मोटार व सोन्याचे दागीने उजेडात आले. तसेच एका आरोपीने त्याच्या पत्नीच्या बॅंक खात्यामध्ये १३ लाख ६४ हजार रुपये जमा करुन ठेवल्याने पोलीसांनी हे बॅंक खाते सु्द्धा गोठविण्याची सूचना बॅंकेला केली.

हेही वाचा >>> साकव दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांना मदतीची प्रतीक्षा, दोन आदिवासींचा मृत्यू; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

दोनही आरोपी हे राजस्थान येथील भरतपूर व बुंदी जिल्ह्यातील असून त्यांची वय २४ व ३८ वर्षे आहेत. या प्रकरणात अजून काही आरोपींचा  पोलीस शोध घेत आहेत. या तीघांनी मिळून नवी मुंबईत सात वेगवेगळ्या चो-या केल्याचे पोलीसांच्या तपासात उघड झाले.  चोरीची पद्धतचोरीसाठी दोन स्कुटीचा वापर केला जात होता. बाजारातील व्यापारी बॅंकेतून पैसे काढतात याकडे हे संशयीत लक्ष्य ठेवत होते. व्यापा-यांचा पाठलाग करताना ते स्कुटीची नंबर प्लेट काढून ठेवत असंत. त्यानंतर संबंधित मोटारीत व्यापा-याने पैसे ठेवले त्या मोटारीचा पाठलाग करुन ती मोटार उभी केल्यावर काही क्षणात त्या मोटारीची काच फोडत होते. काही क्षणात पैसाने भरलेली बॅग पळविल्यानंतर नंबर प्लेट नसलेल्या स्कुटीने दूस-या परिसरात जाऊन तेथे कपडे बदलून स्कुटीचा खरी नंबरप्लेट लावून चोरलेल्या पैशांची वाटणी करुन घेतल्यानंतर वेगवेगळ्या दिशेने जात असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त लांडगे यांनी सांगीतले.