अमेरीकन राजदुतांनी सोमवारी चिरनेर ते रसायनी अशी ९० किलोमीटर सायकल सफारी केली. यावेळी राजदूत उरण येथे येणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी चिरनेर-गव्हाणफाटा आणि खारपाडा पर्यंत अवजड वाहनांना बंदी करून हा रस्ता मोकळा केला होता. या बंदीमुळे नेहमी अवजड वाहनांचा खडखडाट आणि अवजड वाहनांची गर्दी असलेल्या या रस्त्यावर शनिवारी शुकशुकाट होता. नेहमी प्रचंड वर्दळ असलेल्या या रस्त्यावर एकसुद्धा अवजड वाहन दिसत नव्हते. त्याचप्रमाणे मोठा पोलीस बंदोबस्त जागोजागी ठेवण्यात आला होता.

हेही वाचा- नवी मुंबई : घाऊक बाजारात कांदा तिशीपार

शनिवारी सकाळपासून हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी अमेरीकन राजदूत आणि एक कर्मचारी सायकल स्वारीसाठी उरण येथे आले होते. चिरनेर येथून त्यांनी आपल्या सायकलींगला सुरूवात केली आणि रसायनी पोलीस ठाण्यापर्यंत सुमारे ९० किलोमीटर त्यांनी सायकलवर प्रवास केला. या त्यांच्या सायकल फेरीसाठी ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रसायनीवरून ते परत चिरनेर येथे आल्यानंतर त्यांचा सायकलचा प्रवास संपला. मात्र, यासाठी या मार्गावरील अवजड वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली होती. रस्त्यावर कुठेही एकसुद्धा अवजड वाहन उभे अथवा धावताना दिसत नव्हते.

हेही वाचा- नवी मुंबई : एपीएमसीमध्ये दुकानदारांचा वाढीव जागेचा वापर

या वाहनांच्या शुकशुकाटामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी देखील आज कित्येक दिवसानंतर शांततेत आणि विना वाहतूक कोंडीच्या प्रवासाचा अनुभव घेतला. तर अनेकांनी मोकळ्या रस्त्याचे फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकून विविध प्रकारच्या विनोदी पोस्ट टाकल्या होत्या. या रस्त्यावर रोज होत असलेल्या वाहतूक कोंडी बाबत कित्येक तक्रारी करून देखील दखल घेतली जात नाही आणि एखाद्या व्हीआयपी साठी जर असे रस्ते मोकळे होत असतील तर असे व्हीआयपी रोज रस्त्यावरून यावे अशा उपरोधिक पोस्ट अनेक समाजमाध्यमांवर फिरत होत्या.

हेही वाचा- नवी मुंबई शहरावर धुक्याची चादर; मान्सून माघारी फिरताच हवेत गारवा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरीकन राजदुत हे या भागात सायकलींग साठी येणार होते त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्यात आली होती. अमेरीकन राजदुत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चिरनेर येथून सायकलींगला सुरूवात केली आणि ते रसायनीपर्यंत गेले. सुमारे ९० किलोमीटर त्यांनी सायकलने प्रवास केला असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.