पनवेल : खारघर वसाहतीमधील लिटील वर्ल्ड मॉल मधील सिनेमागृहात काम करणारे कर्मचारी आणि सिनेमागृह व्यवस्थापन करणारे नवे व्यवस्थापक यांच्यातील वाद पोलीस ठाण्यात गेला आहे. मेसर्स बालाजी मुव्ही प्लेक्स या कंपनीच्या अधिका-यां विरोधात गुरुवारी पोलीसांत गुन्हा नोंदविला आहे.

खारघर वसाहतीमधील लिटील वर्ल्ड मॉलमध्ये सिनेमागृह मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या मॉलमधील इतर गाळ्यांमधील अर्थकारण ढिम्म झाले आहे. यापूर्वी मे. धरती कन्स्ट्रक्शन एलएलपी ही कंपनी सिनेमागृहाचे व्यवस्थापन चालवित होते. मागील पाच वर्षांपासून ४३ कामगार या सिनेमागृहात काम करतात. सिनेमागृह चालविण्याचे काम मधल्या काळात इतर कंपनीला धरती कंपनी दिले होते. त्यावेळेसही व्यवस्थापन कंपनी आणि कामगार यांच्यात अनेकदा वाद झाले.

हेही वाचा >>> उरण: कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील आठवड्यात धरती कन्स्ट्रक्शन कंपनीने बालाजी मुव्ही प्लेक्स कंपनीला सिनेमागृहाचे व्यवस्थपान चालविण्यास दिले. हे सिनेमागृह सूरु करण्याच्या तयारीत बालाजी मुव्ही कंपनी असताना दोन दिवसांपूर्वी ठाणे येथील औद्योगिक कामगार न्यायालयाने संबंधित कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे निर्देश दिले. श्रमिक कामगार संघटनेच्या माध्यमातून हा लढा कामगार लढत आहेत. बालाजी मुव्ही कंपनीच्या अधिका-यांना खारघर पोलीसांनी औद्योगिक कामगार न्यायालयाचे निर्देश पाळण्याचे आवाहन केले. परंतू कामगारांना परत कामावर न घेतल्याने खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजीव शेजवळ यांनी बालाजी मुव्ही कंपनीचे अधिका-यांविरोधात पोलीस व न्यायालयाच्या निर्देश न पाळल्याने गुन्हा नोंदविला.