संतोष सावंत

पनवेलमध्ये महापालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, औद्योगिक वसाहतीचे रस्ते, गावागावांना जोडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची सध्या दयनीय अवस्था झाली आहे.यातील सर्वाधिक पाणी साचणारे रस्ते म्हणून तळोजा औद्योगिक वसाहतीमधून पालेगावातून चिंध्रण गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचा उल्लेख करावा लागेल. नानक फूड्स कंपनीकडून एक रस्ता वावंजे गावात जातो आणि दुसरा रस्ता पालेगावाच्या हद्दीतून चिंध्रण गावाकडे जातो. याच रस्त्यातील सुमारे ५० मीटर लांबीच्या आणि १६ फूट रुंदीच्या रस्त्यावरील दगडमाती वाहून गेल्याने या रस्त्यात दोन ते तीन फूट पाणी साचल्याने येथे डबके तयार झाले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात लघुउद्योजकांसाठी ५० वर्षांपासून जवाहर इंडस्ट्रीज आणि पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट अशा दोन औद्योगिक सोसायटी आहेत. या सोसायटय़ांच्या अंतर्गत दोनशेहून अधिक कारखान्यांपर्यंत शिरण्यासाठी अंतर्गत रस्ते वाहनांसाठी धोकादायक बनले आहेत.

flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
North East Mumbai Lok Sabha Constituency Citizens Health Issue
आमचा प्रश्न – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला


केंद्र व राज्य सरकार या उद्योजकांना रस्ते बांधून देण्यासाठी विशेष काही नियोजन करेल या अपेक्षेने येथील उद्योजकांचे लक्ष लागले आहे. अशीच अवस्था कळंबोलीतील लोखंड पोलाद बाजारातील अंतर्गत रस्त्यांची आहे. लहान बोट पाण्यातून फिरू शकेल एवढय़ा मोठय़ा खड्डय़ात लोखंड बाजारातील रस्ते हरवले आहेत. कळंबोली वसाहतीमधील रोडपाली तलाव ते केएलई महाविद्यालय पट्टय़ातील रस्ता खड्डय़ांनी भरला आहे. तसेच डी’मार्ट दुकानामागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनालगतचा रस्ता अवजड वाहने सतत उभी केल्याने दयनीय अवस्थेत आहे.खारघर वसाहतीमधील स्पेगिटी ते तळोजाकडे जाणारा रस्ता पूर्ण खड्डय़ांनी व्यापला आहे. खारघर प्रवेशद्वारावरून पनवेलला जाणाऱ्या मार्गावर खड्डे मोठय़ा प्रमाणात आहेत. तळोजा औद्योगिक वसाहतीमधून नावडेफाटाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर दोनच खड्डे भलेमोठे आहेत. तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये गतिरोधक जीवघेणे झाले आहेत.