दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून नागरिकांची उत्साहात दिवाळीची खरेदी सुरु आहे. तर दुसरीकडे रविवारी उरण शहरातील अनेक विभागातील वीज अचानकपणे खंडीत झाल्याने ऐन दिवाळीत उरण शहर अंधारात गेलं आहे.
हेही वाचा- नवी मुंबईत दिवाळीतच शिमगा..! मंदा म्हात्रेंचा गणेश नाईकांना अप्रत्यक्षपणे इशारा
शुक्रवारपासून दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. यासाठी विविध वस्तूंनी बाजारपेठ ही सजली आहे. या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी झाली आहे. उरण शहरातली वीज ऐन खरेदीच्या वेळी गेल्याने उरण मधील व्यावसायिकाकडून महावितरण कंपनीच्या विरोधात संताप व्यक्त केला जात. मात्र काही दुकानात इन्व्हर्टर असल्याने त्या विजेचा वापर केला जात आहे.
हेही वाचा- उरण: रेल्वे रुळावरून वाहन चालकांचा धोकादायक प्रवास
उरण शहरात पावसाळ्यात मागील महिन्यात वीज खंडीत होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. याचा फटका उरण मधील छोट्या मोठ्या व्ययसाय करणाऱ्यांना तसेच विविध विद्यालयात विद्यार्थी यांना ही बसत आहे. सध्या सर्वत्र दिवाळीच्या सणाची तयारी सुरू असतांना अचानकपणे उरण शहरातील अनेक विभागातील वीज खंडीत झाल्याने शहरातील अनेक भागातील रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली आहे. त्याचबरोबर नागरिकांची गर्दी झाली आहे. या संदर्भात उरण विभागाचे महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय सोनावले यांच्याशी संपर्क साधला असता खंडीत वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.