उरण : उरण तालुक्यातील काही भागांत मंगळवारी सकाळी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर काही प्रमाणात उकाडाही सुरू झाल्याने याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागला.

सोमवारी तापमानात वाढ झाली होती. गेले काही दिवस सायंकाळी पावसाचे वातावरण निर्माण होत होते. मात्र पाऊस कोसळत नव्हता. मंगळवारी सकाळी आठ वाजता व त्यानंतरही उरण शहर, नागाव, केगाव परिसर आदी भागात काही प्रमाणात मोसमीपूर्व पावसाच्या सरींनी शिडकावा केला. यामुळे काही काळासाठी हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने वातावरण तप्त झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.