मराठी सणांपैकी उत्साही  प्रकाशोत्सव असा दीपावलीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दोन वर्षांपूर्वी ठप्प झालेली सुक्या मेव्याची मागणी आता वाढत असून एन दिवाळी सणात सुक मेवा महागला आहे. खारीक आणि पिस्ता प्रतिकिलो १०० रुपयांनी महागला असून मनुका ही वधारला आहे.

हेही वाचा >>> पत्नीशी वाईट बोलणाऱ्या व्यक्तीवर पतीकडून चाकूने वार; हल्ल्यानंतर आरोपी स्वत:हून पोलीस स्थानकात हजर

दिवाळीसणात घरोघरी तयार केल्या जाणाऱ्या तसेच रेडीमेड फराळामध्ये तसेच बाजारातील मिठाईमध्ये प्रामुख्याने काजू, बदाम, पिस्ता, किसमिस आणि खारकेचा वापर केला जातो  अनेक जण हा सुका मेवा आपल्या आप्तेष्टांना तर शासकीय , खासगी कंपन्या आपल्या कर्मचारी वर्गाला भेट म्हणून देतात. परंतू करोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत सुका मेवा भेटवस्तू देण्यात आलेली नाही. मात्र दिवाळीच्या अनुषंगाने सुका मेवा मागणी वाढली आहे त्यामुळे दर वाढ झाली असल्याचे मत व्यापारी हर्षद देढिया यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे यंदा सुका मेवा खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार असून गृहिणींना ही हात आखडता घ्यावा लागणार आहे.

हेही वाचा >>> उद्योगमंत्र्यांकडून उद्योजकांना दिवाळी भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुक्या मेव्यातील मनुका, पिस्ता आणि खारीक या पदार्थाच्या दरात  वाढ झाली आहे. बदाम, काजूचे दर स्थिर आहेत मात्र पिस्ता आणि खारीकेच्या दरात प्रतिकिलो मागे १००रुपयांनी महाग झाले आहे. तर मनुक्याच्या दरात  १०ते२०रुपयांनी वाढ झाली असून  २५०-६५०रुपयांनी उपलब्ध आहे.  पिस्ता आधी ९५०ते १००० रुपये होता ते आता  १०००ते ११०० रुपयांनी उपलब्ध आहे . तर  १५०-२५०रुपयांनी मिळणारी खारीक  आता २५०ते ३५० रुपयांनी विक्री होत आहे.