नवी मुंबईचाच भाग म्हणून विकसित होत असलेल्या उरण वाढत्या नागरीकरणामुळे तालुक्यातील कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीना कचराभूमीची जागा नसल्याने ग्रामपंचायतीकडून गावातील कचरा गावा शेजारील रहदारीच्या रस्त्यावर टाकण्यात येत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील अनेक गावांना व विभागातील रस्ते हे गावातील कचऱ्यानी भरू लागले आहेत. सततच्या पावसामुळे हा कचरा कुजू लागल्याने कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवासी व नागरिकांना नाक मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे.
उरण तालुक्यात ३५ ग्रामपंचायती,एक नगरपरिषद व नव्याने विकसित होणारे द्रोणागिरी नोड शहर या परिसरातील वाढत्या नागरीकरणामुळे कचरा ही वाढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- उरणमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडीत; सीसीटीव्हीवर परिणाम

४० किलोमीटर वाहून न्यावा लागतो कचरा

एकीकडे सरकार कडून स्वच्छता अभियान व स्पर्धा आयोजित केल्या जात असतांना उरणमधील नागरपरिषदेला कचराकुंडी नसल्याने पनवेलमधील कचराभूमीत ४० किलोमीटर अंतरावर नगरपरिषदेतील कचरा वाहून न्यावा लागत आहे. तर उरण मधील ग्रामपंचायतीमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाटीची समस्या वाढली आहे. या निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून भूखंड तर येथील मोठ्या उद्योगांकडून निधी मिळावा अशी मागणी उरण पंचायत समितीच्या वतीने वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष केली जात आहे. त्यामुळे गावागावांतील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे.

हेही वाचा- नवी मुंबईत डेंग्यू ,मलेरिया रुग्णांत वाढ; जानेवारी ते आतापर्यंत मलेरियाचे ६० तर डेंग्युचे १० रुग्ण

कचऱ्याची समस्या आणखी वाढण्याची शक्यता

सध्या उरणचा विकास झपाट्याने होत असतांना कचऱ्याची समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून उरण मधील निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problems with piles of garbage in uran dpj
First published on: 23-09-2022 at 13:17 IST