आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गरजूंना रोजगारासाठी कर्ज वितरीत करण्यात येते. मात्र सदर कर्ज फेडल्यानंतर त्याचा व्याज परतावा परत देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे सदर व्याज परतव्याची परतफेड तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी समता सहकारी सामाजिक संस्थेच्यावतीने ऍड चंद्रकांत निकम यांनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा- बदलापूरच्या पर्यटन कंपनीकडून दुबईला जाणाऱ्या १८ पर्यटकांची फसवणूक

mumbai, Bhabha Hospital, Nurse Assaulted, Nurse Assaulted at Bhabha Hospital, Nurses warns Strike, Nurses Safety Concerns, Bhabha Hospital nurses warns Strike, hospital news, Bhabha hospital news, nurse assaulted news,
मुंबई : परिचारिका आंदोलनाच्या पवित्र्यात, सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी कर्मचारी संघटना आक्रमक
challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या

अण्णासाहेब पाटील अर्थीक विकास महामंडळ मर्यादित या योजने अंतर्गत विविध बँकातून कर्जदारांना कर्ज देण्यात येते. कर्ज परतफेड केल्यानंतर त्याचा व्याज परतावा दिला जातो. मात्र आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शेकडो तरुणांनी कर्ज घेऊन त्याची रीतसर परतफेड केली आहे. मात्र कर्ज फेडल्यानंतर त्याचा व्याज परतावा देण्यात बँका टाळाटाळ करीत आहेत.

हेही वाचा- बघितलं आनंदा.. आपल्या एकनाथाने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या..; ठाण्यात शिंदे समर्थकांकडून फलकबाजी, उद्धव ठाकरे गटाला चिमटा

ही संख्या ५०० च्या घरात असून व्याज परतावा मिळावा म्हणून कर्जदार बँकामध्ये खेटा घालत आहेत. त्यामुळे अशा कर्जदारांना थकीत व्याज परतावा तात्काळ बँक खात्यामध्ये मिळावा. भविष्यात अशा घटना परत घडू नये यासाठी बँकेचे पदाधिकारी, महामंडळाचे अधिकारी व योजना धारक यांच्या सोबत पुढील १५ दिवसांत बैठक घेऊन पुढील व्याज परतावा परत करण्यासाठी कायम स्वरूपी तोडगा अशी मागणी समता सहकारी सामाजिक संस्थेच्या वतीने ऍड चंद्रकांत निकम यांनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या कडे केली आहे.