नवी मुंबईतील उरणमध्ये अवकाळी पावासाने हजेरी लावलीय अवघ्या अर्ध्या ते एक तासांच्या पावसाने उरण- पनवेल मार्गावरील बोकडविरा व वायू विद्युत केंद्राच्या कामगार वसाहती जवळ मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना रस्त्यातील खड्डयात साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला आहे.
हेही वाचा- कुणी मैदान देता का मैदान! उरणमधील खेळाडूंचे मैदानाअभावी नुकसान
सध्या उरणमध्ये दररोज परतीचा पाऊस सुरू असून गुरुवारी एक ते दीड वाजता उरणमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाळा सुरुवात झाली आहे. गुरुवारी उरणमधील अनेक गावांत पाऊस सुरू झाला आहे. उरण शहरातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी कडक ऊन पडले होते. मात्र, दुपारी १ ते दीड वाजताच्या सुमारास आभाळात काळ्या ढगांची दाटी सुरू झाली होती. त्यानंतर विजेचा कडकडाट सुरू झाला. साधारणपणे सायंकाळी सुरू होणारा पाऊस गुरुवारी दुपारीच सुरू झाल्याने छत्री, रेनकोट न घेता घराबाहेर पडलेल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना या पावसामुळे भिजतच घरी परतावे लागले. तर काहींनी मिळेल त्या ठिकाणी पाऊस थांबण्याची वाट पाहत थांबावे लागले.
हेही वाचा- नवी मुंबई : दिवाळीच्या तोंडावर सुका मेवा महागला ; पिस्ता, खारीक, मनुका वधारला
पाऊस आणखी किती दिवस
ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. या महिन्यात ही पाऊस होत असल्याने नागरिकांकडून वैतागले आहेत. आणखी किती दिवस पाऊस होणार, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.