गेल्या काही महिन्यांपासून कांद्याने उच्चांक गाठला होता. अवकाळी पावसामुळे जुना कांदा भिजून खराब झाला होता तर नवीन कद्यांच्या उत्पादनलाही फटका बसला होता . त्यामुळे बाजारात आवक घटल्याने दर वधारले होते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून बाजारात कांद्याची आवक वाढत असून दर आवाक्यात आहेत. शुक्रवारी बाजारात कांद्याची बंपर आवक झाली असून १९०-२००गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात १८ ते २२रुपयांनी उपलब्ध असलेला कांदा १०ते १६ रुपयांनी विक्री होत आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई : फ्लॅटमधून गुटखा विक्री, विक्रेत्यावर कारवाई

एपीएमसी बाजारात पावसाने नवीन कांद्याच्या उत्पादनावर पाणी फेरले होते . त्यामुळे नवीन कांद्याचे हंगाम लांबला. तसेच साठवणुकिचे जुने कांदे ही खराब झाले होते. त्यामुळे बाजारात उच्चतम प्रतिचा कांदा आवक ही कमी होती .त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याने तिशी तर किरकोळ बाजारात चाळीशी गाठली होती. परंतु मागील दोन महिन्यांपासून बाजारात नवीन कांदा ही दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात चढउतार होत आहे. गुरुवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजार समिती बंद होती त्यामुळे दोन ते तीन दिवसांचे शेतमाल एकदम दाखल झाल्याने आवक वाढली आहे.

हेही वाचा >>>आमदार निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ, चोरट्यांनी हिसकावला महिलेचा सोन्याचा हार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी एपीएमसी बाजारात कांदा आणि बटाट्याची बंपर आवक झाली असून. कांदा १९०-२००गाडी तर बटाटा ९४ गाडी आवक झाली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. जुना बटाटा १६-२२तर नवीन बटाटा १२-१६रुपयांनी विक्री होत आहे.