लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : नवी मुंबईत खासदार, आमदार, न्यायाधीश, सनदी अधिकाऱ्यांसाठी पामबीच मार्गालगत गृहनिर्माणाच्या कामाला गती दिली जात आहे. सिडको मंडळामध्ये मंगळवारी पामबीच मार्गावरील मोक्याच्या भूखंडावर भव्य आणि अत्याधुनिक सुविधांनी उपयुक्त असणाऱ्या निवासी संकुलाच्या सल्लागार नेमण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

आणखी वाचा-खोदकामात पालिकेची फसवणूक; ‘मायक्रो ट्रेंच’ उपकरणाऐवजी जेसीबीचा वापर, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहराच्या मुख्य मार्गालगत (पामबीच) राज्य व देशातील प्रमुख व्यक्तींना राहण्यासाठी कायमस्वरूपी निवासस्थान असावे यासाठी हे भव्य निवासी संकुल सिडको महामंडळ बांधत आहे. पुढील तीन वर्षांत सिडको मंडळाने सल्लागार कंपनी नेमल्यानंतर कंपनीने पर्यावरण मंजुरी, वृक्षारोपण इत्यादीसहित सर्व मंजुरी मिळवण्याबरोबरच संकुलाची वीज व्यवस्था, अंतर्गत तांत्रिक तसेच प्लम्बिंग आणि अग्निसुरक्षा यांसारख्या सेवांसहित मास्टरप्लॅन तयार करणे, तसेच या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल तयार करून या प्रकल्पासाठी लागणारा खर्चाचा तपशील तयार करायचा आहे. त्यासाठी अभियांत्रिकी आणि सेवा डिझाईन तयार करण्याच्या सेवांसाठी वास्तुरचनाकार नेमण्यासाठी सिडको मंडळाला सल्ला या सल्लागार कंपनीने द्यायचा आहे.