उरण: पावसाळ्यातील बंदीनंतर नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात होऊन दोन महिने झाले आहेत. मात्र या काळात वारंवार बदलणाºया वातावरणामुळे मासेमारीस लागणारा अधिकचा काळ तर दुसरीकडे श्रावण महिना आणि गणेशोत्सवातील उपवासाचे दिवस संपल्याने मासळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे आवक आणि मागणी यातील तफावतीमुळे किरकोळ मासळीच्या दरात सरासरी २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मासेमारीच्या एका फेरीसाठी होणारा दोन-तीन लाखांचा खर्चही निघेनासा झाला आहे. या संकटाला समुद्रातील कमी होणारी मासळींची संख्या कारणीभूत ठरू लागली आहे. मासेमारीसाठी एका छोट्या बोटीला मासेमारीसाठी एका फेरीसाठी दोन टन बर्फ, ६०० लिटर डिझेल आणि खलाशी व बोट आणि इतर खर्च करावा लागत आहे, तर मोठ्या बोटींना दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो. दुसरीकडे समुद्रातील वाढलेले प्रदूषण, वारंवार येणारी वादळे व बेकायदा केल्या जाणाºया बेसुमार मासेमारी यामुळे मासळीच मिळेनाशी झाली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा… उरण : अवजड कंटनेर वाहनांनी खोपटा पूल मार्ग रोखला, दोन्ही बाजूने वाहने उभी केल्याने अपघाताचा धोका

सागरी जलाधी क्षेत्रात मासळी कमी होण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे परदेशी व परराज्यातील मच्छीमार बोटी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्याच्या हद्दीत राजरोसपणे मोठ्या प्रमाणात मासेमारी करीत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतूनच दररोज लाखो टन मासळी पकडून परराज्यात विक्री केली जात आहे.

हेही वाचा… उरणच्या शेतजमिनीवर दलालांचा डोळा, शिवडी-न्हावाशेवा पूल, नव्या रेल्वेमुळे जमीन विक्रीला जोर

मच्छीमारांना सोन्याचा दर मिळवून देणारा घोळ मासा सध्या गायब झाला आहे. त्यामुळे एक ठोक उत्पन्न देणारा हा मासा मिळत नसल्याने मच्छीमारांना त्याची प्रतीक्षा असल्याचे मत करंजा येथील मच्छीमार विनायक पाटील यांनी व्यक्त केले आहे. समुद्रातील मासळी मिळेनाशी झाली आहे. त्याचप्रमाणे खवय्यांची आता ताज्या स्थानिक मासळीची ओढ वाढली आहे. त्यामुळे शेततळ्यातील मासे, कोळंबी जिवंत मासळी यांची २५० ते ५०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Story img Loader