सामान्य नागरिक आणि सरकारी अधिकाऱ्यांना २६ नोव्हेंबर हा संविधान दिन असल्याची जाणीव करून देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने यंदा पनवेलमध्ये संविधान गौरव दिन साजरा करणार आहे.
हजारो रुपये खर्च करून यासाठी संविधान गौरव दिनाचे फलक झळकविण्यात आले आहे. सध्या तालुक्यामध्ये संविधानाचा पोस्टरमारा हाच चर्चेचा विषय बनला आहे.
२६ नोव्हेंबर १९५० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना देशाचे संविधान सादर केले होते. या पाश्र्वभूमीवर हा उपक्रम होत आहे.
डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. काही वारकरी संविधान दिंडी काढणार आहेत.