नवी मुंबई : नवी मुंबईतील सानपाडा येथे साखळी चोरांनी धुमाकूळ घातला असून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर दोन महिलांच्या गळ्यातील साखळी बाळजबरीने खेचून नेली. यातील एक महिला तर दुचाकीवरून जात असताना तिच्या गळ्यातील साखळी चोरी केली. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात “त्या” दोन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नेरुळ भागात काही दिवसांच्या पासून साखळी चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. साखळी चोरी करणाऱ्यांचे धाडस एवढे वाढले आहे कि ६ ऑगस्टला रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील आणि काही अंतरावर पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला आहे.
सहा ऑगस्टरोजी रात्री अकाराच्या सुमारास नेरुळ सेक्टर २७ येथील एअर इंडिया कॉलेनी परिसरातून सरबजीत सिंग भोम्ब्रा हे ५८ वर्षीय निवृत्त व्यक्ती दुचाकीवरून जात होते. काही वेळात त्यांच्या जवळून अन्य दुचाकी स्वार आला. त्याच्या गादीवर मागे अन्य व्यक्ती बसली होती. त्या अनोळखी व्यक्तीने सरबजीत यांच्या समांतर गाडी चालवणे सुरु केले आणि काही कळण्याच्या आत सरबजीत यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी बळजबरीने हिसकावून सुसाट गाडी दामटली. हि घटना घडल्या नंतर काही मिनिटातच नेरुळ सेक्टर १ येथून एक महिला पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दुकलीने त्यांच्याही गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या एकाच वेळेस हिसकावून पळून गेले.
याबाबात दोघेही फिर्यादी नेरुळ पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. पोलिसांना त्यांनी चोरट्यांचे वर्णन सारखेच असल्याने एकाच तक्रारीत चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेत सरबजीत सिंग यांच्या गळ्यातील २ लाख ४० हजार किमतीची अंदाजे ३ टोळ्यांची सोन्याची साखळी तसेच अन्य महिला फिर्यादी यांच्या गळ्यातील २ लाख ४० हजार किमतीच्या दोन सोन साखळ्या अशी एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे.या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.