जेएनपीटी कामगार वसाहतीतील इंडियन एज्युकेशन संस्थेच्या सरोज जितेंद्र पाटील या विद्यार्थ्यांची १६ वर्षांखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

रायगड जिल्हा हा कबड्डीसाठी प्रसिद्ध असून उरण तालुक्यातील बोकडवीरा हे गावही कबड्डीचे केंद्र बनले आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये बोकडवीरा येथील गणेश क्लब संघाने सातत्यपूर्ण यश मिळवले आहे. या संघाने वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनाचा सरोजला खूप लाभ झाला आहे. सरोजची राज्य संघात निवड झाल्याबद्दल गणेश क्लबचे सल्लागार किशोर पाटील तसेच त्याचे शिक्षक टेमकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.