नवी मुंबई : दोनच दिवसांपूर्वी एक स्कूलबस मुंबई पुणे मार्गावरील बोरघाटात अपघात ग्रस्त होऊन २ विद्यार्थांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजीच असतना उलवे येथेही स्कूल बसचा अपघात झाला. मात्र सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. बस चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

उलवा नोड मधील सेक्टर २३ येथे आयएमएस नावाशी शाळा आहे. आज (मंगळवारी) सकाळी नेहमी प्रमाणे स्कूल बस मधून विद्यार्थांना शाळेत घेऊन जाताना बसने एका रिक्षाला धडक दिली. यावेळी बस थांबल्यावर बस चालकाने प्रचंड प्रमणात मद्य घेतले असल्याचे निदर्शनास आले. त्याला धड बसताही येत नव्हते. नशेच्या अधीन गेल्याने वारंवार स्टेअरिंग वर डोके ठेवत असल्याने त्याने मद्य घेतल्याचे लक्षात आल्यावर काही जागरूक नागरिकांनी बस पुढे जाऊ न देता शाळा प्रशासन आणि पोलिसांना या संदर्भात माहिती दिली.

नवी मुंबई महापालिकेचा कचरा वाहतूक व संकलनासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनीही तत्काळ त्याला ताब्यात घेतले तर शाळा प्रशासनाने अन्य बस उपलब्ध करीत विद्यार्थांना शाळेत सोडले. बस चालकाचे नाव थोरात असून घटनेनंतर त्याच्यावर  तात्काळ त्याला कामावरून काढण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी  झाले नाही. अशी माहिती शाळेचे कर्मचारी वैभव पंडित यांनी दिली. तर कारवाईची माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिली.