उरण : शासकीय सेतू कार्यालयातील इंटरनेट सेवा खंडित झाल्याने उरणचे सेतू केंद्र बंद झाले आहे. त्यामुळे शालेय दाखल्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू झाली आहे. तर दुसरीकडे खाजगी केंद्रावरील गर्दीत वाढ झाली आहे.

शाळा व महाविद्यालयाच्या प्रवेशाची लगबग सुरू असताना त्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांनी शासकीय सेतू कार्यालयात अर्ज केले आहेत. मात्र सध्या सर्व दाखले ऑनलाइन पद्धतीने दिले जातात. त्यासाठी सेतूमधून शासकीय संकेतस्थळावर अर्ज करावे लागतात. इंटरनेट सेवाच मागील चार दिवसांपासून खंडीत झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. उरणच्या सेतू विभागात दिवसाला ८० ते ९० अर्ज येतात. आशा विद्यार्थ्यांना दाखल्याची प्रतिक्षा आहे.

हेही वाचा – पनवेल : पाण्याविना उद्योग कसे चालवायचे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भात उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्याशी संपर्क साधला असता शासकीय सेतूची सेवा सर्वत्र बंद असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तर सेवा बंद झाली असली तरी ऑनलाइनशिवाय दाखले देता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.