तळोजा औद्योगिक वसाहतीतील टिकीटार इंडिया कंपनीत आठवडय़ापूर्वी लागलेल्या आगीतील मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे. ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात शुक्रवारी रात्री अनंत सपकाळ यांचा आणि शनिवारी सायंकाळी राहुल सिंग यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. डांबर कंपनीत लागलेल्या आगीत आठ जण होरपळले होते. या सर्वाना नॅशनल बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.