मूळ मध्यप्रदेशचा मात्र अनेक दिवसांपासून पनवेल शहरात फीरस्ता असणा-या मनोरुग्ण तरुणाने पनवेल शहरातील विविध ठिकाणची सहा वाहने शुक्रवारी मध्यरात्री पेटवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या मनोरुग्णाचे नाव धमेंद्र असे असून तो पोलीसांना त्याचे आडनावही सांगू शकत नाही.

हेही वाचा- VIDEO: पेपर कंपनीला भीषण आग

Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव

पेटवलेल्या वाहनांमध्ये पालिकेच्या मालकीच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. पनवेल शहर पोलिसांचे विविध पथक या माथेफीरुचा शोध घेत होते. शहरातील विविध सीसीटिव्ही कॅमेरांची तपासणी केल्यावर धमेंद्रच्या हालचाली संशयास्पद दिसल्यानंतर त्याचा शोध पोलीस पथकाने सूरु केला. शहरातील तीन दुचाकी, एक रिक्षा आणि फवारणीसाठी वापरण्यात येणारा महापालिकेच्या मालकीचा ट्रॅक्टर अशा वाहनांचे या जळीतकांडात नूकसान झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री शहरातील नंदनवन कॉम्प्लेक्सजवळील सप्तगिरी बारसमोरील एक दुचाकी, पटेल रुग्णालय परिसरात तीन दुचाकी, जोशी आळीतील एक रिक्षा आणि सरस्वती शाळेच्या आवारात उभा केलेला महापालिकेचे ट्रॅक्टर या ठिकाणी आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आग लावली कोणी याबाबत विविध तक्र काढले जात होते. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस मानसरोवर रेल्वेस्थानकाबाहेरील आवारात ४२ दुचाकी आगीत खाक झाल्या होत्या. हे आगीचे तांडव ताजे असताना धमेंद्र याचा या जळीतकांडाशी काही संबंध आहे का याबाबत पोलीस तपास करीत आहेत. शुक्रवारी आगीची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाच्या वाहनाने घटनास्थळी धाव घेतली. महापालिकेच्या मालकीच्या वाहनांना लागलेल्या आग विझवण्यात दलाला यश आले, मात्र इतर वाहने खाक झाली होती. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने यांनी दिलेल्या माहितीनूसार संशयीत धमेंद्र याला ताब्यात घेतला असून त्याचा वैद्यकीय तपासणी केल्यावर तो मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीसांचे एक पथक त्याला वैद्यकीय अधिका-यांच्या सल्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णालयात रविवारी नेणार आहेत.

हेही वाचा- पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

पोलीसांसमोर शुक्रवारी मध्यरात्री शहरातील विविध भागांमध्ये वाहनांना आग लागल्याची घटना उजेडात आल्यावर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रमोद पवार आणि उपनिरिक्षक अभय शिंदे यांना संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. दोनही अधिका-यांनी व त्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन तातडीने काही तासांतच धमेंद्रचा शोध घेतला. जे.जे.वूड या दूकानाच्या सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या चित्रीकरणामुळे धमेंद्रच्या हालचाली त्या रात्री संशयास्पद वाटल्या. त्याची चौकशी केल्यावर तो स्वताच्या लग्नाविषयीच बोलतो इतर काही त्याला आठवत नसल्याचे त्यांच्या संभाषणातून समोर आले असल्याचे पोलीस अधिकारी कादबाने यांनी सांगितले.

हेही वाचा- महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणे पडले महागात; गुन्हा दाखल

१२०० कोटी रुपयांची वार्षिक आर्थिक उलाढाल असणा-या पनवेल महापालिकेने सहा वर्षे स्थापनेनंतरही शहरात सीसीटिव्ही कॅमेरांचे जाळे उभे करु शकली नाही. पालिकेच्या नाट्यगृहाच्या वाहनतळात पालिकेची वाहने दररोज उभी केली जातात. जळीत कांडातील ट्रॅक्टर याच वाहनतळात उभा केला जात होता. मात्र शुक्रवारी कॉंग्रेस पक्षाचे इंटक कामगार संघटनेचे आधिवेशन असल्याने वाहनतळात आधिवेशनातील पदाधिका-यांची जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे ही सर्व वाहने सरस्वती शाळेच्या आवारात उभी केली होती. जेथे ट्रॅक्टर उभा केला होता. तेथे सूरक्षा रक्षक नेमला नव्हता. पनवेलमध्ये पालिका बेघरांसाठी व्यवस्था उभी करत आहे. मात्र शहरातील सूरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणा-या सीसीटिव्ही कॅमेरांचे जाळे पालिका कधी उभारणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शुक्रवारच्या जळीत कांडाचा शोध जे.जे.वूड या खासगी दूकानाच्या सीसीटिव्ही कॅमेरामुळे लागू शकला.