पनवेल : महिन्याभरापुर्वी अंबरनाथ येथे बैलगाडा शर्यतीच्या वादामुळे गोळीबाराचे प्रकरण ताजे असताना शुक्रवारी विनापरवानगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याने पनवेल शहर पोलीसांनी ५० आयोजकांवर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आजही बैलगाडा शर्यतींसाठी मोठा प्रेक्षकवर्ग आहे. यातील बोटावर मोजण्या इतके बैलगाड्यांचे मालक वगळता इतर सर्वांनी या शर्यतीला क्रीडा प्रोत्साहनाच्या दृष्टीकोनातून पाहिले आहे.

कल्याण येथील बैलगाड्याचे मालक राहुल पाटील आणि पनवेलच्या बैलगाड्याचे मालक पंढरी फडके यांच्यात गाडा जिंकण्यावरुन आणि कोणाचा बैल सरस यावरुन वाद झाले. सूरुवातीला झालेला शाब्दिक वादाचे पर्यवसन नंतर समाजमाध्यमांवर एकमेकांना धमकीपर्यंत पोहचले. त्यानंतर महिन्याभरापुर्वी अंबरनाथ येथे गोळीबार झाल्याने हे प्रकरण राज्यात चव्हाट्यावर आले. सध्या पनवेलचा फडके व त्याचे साथीदार संघटीत गुन्हा कायद्याच्या कठोर अंमलबजावणीमुळे कारागृहात आहेत.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

हेही वाचा >>> महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणे पडले महागात; गुन्हा दाखल

फडकेचे समर्थक पनवेलमध्ये नसल्याने फडके व त्याचे साथीदार कारागृहात गेल्यानंतर पनवेलच्या ग्रामीण भागातील शर्यतींचे सत्र थांबले नव्हते. लहानमोठ्या प्रमाणात पनवेलमध्ये बैलांच्या शर्यतींचे आयोजन केले जात होते. फडके हा स्वयंघोषित राज्यस्तरीत बैलगाडा संघटनेचा अध्यक्ष असल्याने त्याच्यावर कारवाई झाल्यानंतर बैलगाडा शर्यतीं भविष्यात पनवेलमध्ये होणार नाहीत अशीही चर्चा झाली. मात्र पनवेलमधील बैलगाडांचे मालक आणि प्रेक्षक फडकेच्या वृत्तीचे समर्थक नसल्याने त्यांनी पनवेलमध्ये बैलगाडांचे शर्यतीचे आयोजन केले.

हेही वाचा >>> ‘भावी पिढीसाठी निसर्ग जपून ठेवण्याची गरज’; विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता तालुक्यात ओवळे गावाच्या स्मशानभूमीशेजारील मैदानात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल शहर पोलीसांना या शर्यतीची माहिती मिळताच पोलीसांनी विना परवानगी शर्यतीचे आयोजन केल्याने रुपेश मुंगाजी, शक्ती गायकवाड, संजय मुंगाजी, प्रितम म्हात्रे, राहुल नाईक, सम्राट म्हात्रे आणि इतर ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमाप्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे.