नवी मुंबई महापालिकाक्षेत्रातील ठाणे बेलापूर मार्ग तसेच पामबीच व इतर महत्वाच्या मार्गांची मोठ्या रस्त्यांची सफाई यांत्रिकी पद्धतीने करण्याची निविदा प्रक्रिया २०११ मध्ये साली राबवण्यात आली होती. या कामाचा ठेका हा सात वर्षासाठी निश्चित करण्यात आला होता. २०११ ते २०१८ नंतर तात्काळ पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया होण्याची आवश्यकता होती. परंतू यांत्रिक साफसफाई निविदा कालावधी उलटून पुढचे पाच वर्ष झाली असतानाही नवीन निविदेसाठी पालिकेला मुहूर्त सापडत नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. त्यामुळे पालिकेची यांत्रिक पध्दतीचे हे काम म्हणजे यांत्रिक साफसफाई की तिजोरीची हातसफाई असाही आरोप करण्यात आला होता. परंतू आता पालिकेने यांत्रिक साफसफाई कामासाठी निविदा प्रक्रिया राबवल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणार- आयुक्त मिलिंद भारंबे

नवी मुंबई महापालिकेने २०१० मध्ये पालिकेने शहरातील महत्वाच्या असलेल्या ठाणे-बेलापुर रोड, पामबीच रोड तसेच शहरातील महत्वाचे मार्ग यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी १६ कोटींच्यापेक्षा अधिकची निविदा प्रक्रिया राबविली होती. सुरुवातीला झालेल्या निविदेत १६ मशिन आणि ४९० कि.मी चा रस्ता सफाईची अट घालण्यात आली होती. परंतु, संबंधित विभागाने चुकीच्या पद्धतीने मुल्यांकन करुन हे काम अँथोनी वेस्टहँडलिंगच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न पालिकेच्या अंगाशी आल्याने या कामाची नव्याने निविदा प्रक्रिया राबवली होती.दुसर्‍यांदा झालेल्या निविदा प्रक्रियेमध्ये मशीनची संख्या १६ वरुन ६ करण्यात येवून प्रतिदिन २१० कि.मी रस्त्याची साफसफाई निर्धारित करण्यात आली होती.. त्यावेळी दोन निविदाकारांनी ४३,९९ कोटी रुपये भरल्याने निविदा प्रक्रिया रद्द करुन तिसर्‍यांदा निविदा काढण्यात आली. यावेळी या निविदेचे परिमंडळ शहरातील परिमंडळानुसार २ भाग करण्यात आले होते. त्यावेळी अ‍ॅन्टोनी वेस्टहँडलिंग प्रा. लि. यांनी ३०.९५ कोटी तर मे.बीव्हीजी इं.लि. यांनी ३२.५७ कोटीची रक्कम निविदेमध्ये भरली. हे काम वरील दोन्ही ठेकेदारांना २०११ पासून पुढील सात वर्षांसाठी देण्यात आले. ज्या कामाची सुरुवात २०१० मध्ये ४४ कोटी होते तेच काम सहा महिन्यात ६२ कोटींपर्यंत पोहचले होते.

हेही वाचा- नवी मुंबईत डान्सबार नव्हे ऑर्केस्ट्रा बार चालवा – पोलीस आयुक्तांचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे स्थानिक लेखानिधी विभागाने आपल्या सन २०१२-१३ च्या अहवालात नमुद करुन संबंधित ठेकेदारांकडून २८.३२ कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. या कामाची मुदत २०११ साली संपली असतानाही आतापर्यंत पालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया राबवलेली नव्हती. आता मात्र या कामाची निविदा मागवण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेने यांत्रिक साफसफाईच्या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे निविदा प्रक्रिया राबवून हे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी दिली.