नवी मुंबई – वाशीतील एपीएमसी बाजारात सोमवारपासून हापूसची आवक वाढली असून, बाजारभाव उतरले आहेत. सोमवारी ३२५ तर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी ४७९ पेट्या दाखल झाल्या आहेत. यंदाच्या पूर्वहंगामातील विक्रमी आवक झाल्याचे मत व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. हापूसच्या प्रतवारी दर्जानुसार ४ ते ८ डझन पेटीची ४ हजार ते ८ हजार रुपयांनी विक्री होत आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : पाळणाघरात १६ महिन्यांच्या बाळाला मारहाण, पालकांची तक्रार

हेही वाचा – नवी मुंबईची डबल डेकर बस सेवा मे मध्ये सुरू होणार, ११ बस ताफ्यात दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा हापूसचे उत्पादन चांगले असेल. परंतु, हंगाम उशिराने सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. जानेवारीत तुरळक प्रमाणात हापूस आवक होती. परंतु, आता फेब्रुवारीपासून हापूसची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात ३०-५० पेट्या दाखल झाल्या होत्या. या आठवड्याच्या सुरुवातीपासून आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, आज मंगळवारी एपीएमसी ४७९ अशी विक्रमी आवक झाली आहे.