उरण : केंद्र सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाचा ठराव लवकरात लवकर मंजूर करावा, अन्यथा भूमीपुत्रांचा आझाद मैदान ते मंत्रालय लॉंग मार्च काढू असा इशारा बुधवारी माजी खासदार दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिला आहे. राज्य सरकारने विमानतळाच्या नावाचा ठराव मंजूर केला आहे.

मात्र त्याच्या मंजुरीला केंद्र सरकार कडून दिरंगाई होत असल्याने भूमिपुत्रांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तरघर, उलवे व चिंचपाडा  येथील प्रवेशद्वारावर समितीच्या वतीने नाम फलक लावण्यात आले. त्यावेळी दशरथ पाटील बोलत होते. त्यांनी लढवय्या भूमीपुत्राच नाव देण्यासाठी शांततेत मागणी करीत आहोत.

हेही वाचा >>> नवी मुंबई: पार्किंग वाद अन् स्क्रू ड्राइव्हर भोसकून हत्या; आरोपी अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्हाला संघर्ष करायला लावू नका असे आवाहन त्यांनी सरकारला केले. त्यांनी यावेळी सरकारने गांधी जयंती पूर्वी निर्णय घ्यावा अन्यथा ११ ऑक्टोबर ला जयप्रकाश नारायण मुंबईत भूमिपुत्रांचा आझाद मैदान ते मंत्रालय असा लॉंग मार्च काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र विधान मंडळाच्या ठरावाची अंमलबजावणी करा. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिलंच पाहिजे, प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा विजय असो च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमात माजी खासदार रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, संजीव नाईक, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, कॉ. भूषण पाटील, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, काँग्रेसचे महेंद्र घरत, माजी आमदार सुभाष भोईर यांच्यासह विविध पक्षाचे नेते व कार्यकर्ते आणि महिलाही उपस्थित होत्या.