मुंबई व नवी मुंबई शहराला जोडणारा वाशी खाडी पुलहा मुंबई व नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा खाडीपूल आहे. या पूलावरुन दररोज लाखो वाहने ये जा करतात. परंतू सध्या अर्धा वाशी खाडीपूल अंधारात व अर्धा खाडीपूल उजेडात असे चित्र येथे पाहायला मिळत आहे. नवी मुंबईहून मुंबईला जाणाऱ्या मार्गाकडील दिवाबत्ती सुरु असून दुसरीकडे मुंबईहून नवी मुंबई व महाराष्ट्राच्या विविध भागाता जाणाऱ्या मार्गावर मात्र अंधार पडत असल्याने वाहनचालकांना पथदिव्यांविना अंधारातच वाहने चालवावी लागत होती. त्यामुळे खाडीपुलावरील अंधारामुळे अनेक अपघातही होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही करत वाशी खाडी पुलावरील दिवाबत्तीची सोय सुरु करावी अशी मागणी करु लागले आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई : ट्रकभर गुटखा आणला खरा ! मात्र पोलिसांनी पकडला

वाशी खाडी पुलाच्या दोन्ही दिशेला असणाऱ्या जवळपास ४ किमी अंतराच्या डांबरीकरणासाठी ४ कोटी ७५ लाख रुपये खर्च करुन रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यामुळे वाहनांचा पुलावरील वेग वाढला आहे. परंतू दुसरीकडे याच पुलावर वारंवार होणाऱ्या अंधारामुळे वाहनाच्या उजेडातच वाहनचालकांना वाशी खाडीपुल पार करावा लागत आहे. मुंबईकडे व पुण्याकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील पथदिव्यांनी डोळे मिटलेले असल्याने सातत्याने अपघात होत असतात. परंतू महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्याच्या डांबरीकरणाबरोबरच वाशी खाडी पुलावरील २०० नवे पथदिवे लावले तसेच पुलाच्या सुरवातीला व शेवटी असे दोन हायमास्टही लावले तसेच सातत्याने वर्दळीच्या पुलावर कधीच रात्रीच्यावेळी अंधार होऊ नये यासाठी जनरेटरचीही व्यवस्था केली आहे. परंतू सातत्याने या वाशी खाडीपुलावर दिवाबत्तीची लपाछपी सुरु असते. त्यामुळे याबाबत तात्काळ कार्यवाही होणे आवश्यक आहे.

हेही वाचा- उरण: खवय्ये घेताहेत गारव्यात वाफाळलेल्या पोपटीचा स्वाद; शाकाहारी व मांसाहारी पोपटी

वाशी खाडी पुलानजीक दोन्ही बाजूला नवे पूल तयार करण्याचे काम जोरात सुरु आहेत. त्यामुळे वाशी खाडीपुलानजीकचा छोट्या वाहनासाठीचा पूलही वाहतूकीसाठी बंद आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर गाड्यांची गर्दी होत असल्याने येथील दिवाबत्तीबाबत अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, असे मत वाहनचालक मंगेश सोनके यांनी व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशी खाडी पुलाबाबत व त्यावरील दिवाबत्तीबाबत अधिक माहिती घेण्यात येईल. येथील दिवाबत्ती तात्काळ सुरु करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता नितीन बोरोले यांनी दिली.