मुंबई सह ठाणे शहरात गोवर बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे . मुंबईत रुग्णसंख्या १५६ वर पोहोचली आहे . त्याचबरोबर नवी मुंबईतही गोवरचे १६० संशयित रुग्ण असून ६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने सतर्क बाळगण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरी आरोग्य केंद्र निहाय लसीकरण सत्रात घरोघरी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>>स्वच्छ शहर नवी मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता राखण्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यापुढे आव्हान

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत बुधवारी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली . या बैठकीत गोवर रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आली आहे . या योजनेअंतर्गत नवी मुंबई शहरातील २३ नारी नागरी आरोग्य केंद्र निहाय लसीकरण सत्रात गोवर बाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिक आरोग्य विभागात अडीच हजाराहून अधिक लहान बालके आहेत. नागरी आरोग्य केंद्रात दर बुधवारी ०-५ वयोगटातील बालकांचे लसीकरण सत्र होत असते. या लसीकरण सत्रात गोवर सदृश्य लक्षणे, ताप किंवा पुरळ आढळत आहेत का ?याबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नवव्या महिन्यातील पहिली लसमात्रा आणि १८ महिन्यानंतर दुसरी लस मात्र घेणाऱ्या मुलांना गोवर होत नाही. परंतु वयोगट ० ते ५ वर्षापर्यंत मुलांनी ही लस घेतली नसेल तर त्यांना गोवरची बाधा होते.

हेही वाचा >>>पनवेल: कळंबोली-मुंब्रा महामार्गावरील कळंबोली उड्डाणपूलावर पडलेच खड्डेच खड्डे

नेरुळ रुग्णालयात ८ खाटा आरक्षित
मुंबईसह नवी मुंबईत देखील गोवर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे गोवर बाधीत गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी नेरूळ येथील महापालिका रुग्णालयात ८ खाटा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत . गोवरच्या उपचारादरम्यान एखाद्या रुग्णाची आरोग्य स्थिती ढासळल्यास त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत ,अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

आरोग्य नागरि केंद्रनिहाय लसीकरण सत्रात गोवर बाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये वयोगट ० ते ५ वर्षांमधील बालकांना लसमात्रा दिलेली आहे का? याची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या घरामधील कोणाला ताप ,पुरळ तसेच गोवर सदृश्य लक्षणे आहेत का ? याबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.-प्रमोद पाटील, आरोग्य अधिकारी ,नवी मुंबई महानगरपालिका