पनवेल: हद्द आणि कामकाजातील विभागांचा वाद अशा वादग्रस्त घटनांमुळे नेहमी पोलीस प्रशासन चर्चेत असते. परंतू रस्त्यावर ताबडतोब न्याय देणारा म्हणून पोलीसाकडे सामान्य नेहमी धाव घेतात. नवी मुंबई पोलीसांच्या तत्काळ कर्तव्यदक्षतेचा अनुभव जयसींगपूरच्या अभय पाटील यांना आला आहे. कळंबोली महामार्ग ते जयसींगपूर या प्रवासा दरम्यान हरवलेला फोन काही तासांत पोलीसांनी जलद तपास करुन मिळवून दिला आहे.

रविवारी जयसींगपूर येथील रहिवाशी अभय पाटील हे काही कामानिमित्त कामोठे येथे आले होते. पाटील यांचे काम आटपून ते कळंबोली येथील मॅकडॉनाल्ड हॉटेलशेजारी खाजगी चार चाकी वाहनाने पुण्याला गेले. पुणे येथे ते खासगी वाहनातून उतरल्यावर त्यांना त्यांचा मोबाईल स्वताजवळ नसल्याचे समजले. ज्या वाहनातून पाटील यांनी प्रवास केला होता. त्याच गाडीत ते मोबाईल फोन विसरल्याने त्यांना पुढे काय करावे सूचत नव्हते. पाटील यांनी काही वेळाने पनवेल शहरात राहणारे त्यांचे मित्र अमित रणदिवे यांना संपर्क साधला. अमीत रणदिवे यांनी कळंबोली वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार अतुल शिंदे यांना याबाबत कळविले. हवालदार शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक हरिभाऊ बानकर यांना याबाबत सांगीतल्यावर वाहतूक विभागाने तातडीने त्या परिसरात नेमणूकीस असलेल्या सोमनाथ गायकवाड यांना त्या परिसरातील पेट्रोलपंप आणि मॅकडोनाल्ड हॉटेलचे सीसीटिव्ही फूटेज तपासले.

Malaysian Development Ruin Scam Election bonds PM Care Fund
‘मलेशिअन डेव्हलपमेंट बरहाद’ : घोटाळ्यांचा बाप! (भाग १)
Kolhapur, bribe, woman food security officer,
लाच स्वीकारताना कोल्हापुरातील अन्नसुरक्षा महिला अधिकारी जाळ्यात
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?

हेही वाचा >>>बीपीसीएलच्या सिलेंडर वाहनांचे रस्त्यावर तळ; प्रवासी व नागरिकांच्या वाहनांना अडथळा

हेही वाचा >>>नवी मुंबई : खदानीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

वाहतूक पोलीसांनी हरवलेला फोनचा तपास करतील म्हणून तक्रारदाराला स्थानिक कळंबोली पोलीस ठाण्यात जाण्याचे सूचवले नाही. वरिष्ठ पोलीस निरिक्षक बानकर यांनी मोबाईल फोन तातडीने शोधण्यासाठीच्या सूचना वाहतूक पोलीसांना दिल्या. सीसीटिव्हीमध्ये ज्या वाहनातून अभय पाटील यांनी कळंबोलीतून प्रवास सूरु केला त्या गाडीचा शोध घेता आला. पाटील हे प्रवास करत असलेल्या वाहनाने कळंबोली येथील पेट्रोलपंपात इंधन भरल्याने त्या वाहनाचा नंबर पोलीसांना मिळाला. नंबर मिळाल्यानंतर त्या वाहनमालकाशी पोलीसांनी संपर्क केला. काही तासांत वाहनमालक आणि वाहनचालकांपर्यंत फोनवरुन संपर्क झाल्यावर कळंबोली वाहतूक पोलीस चौकीपर्यंत तो फोन स्वता चालकाने जमा केला. पोलीसांनी अभय पाटील यांचे नातेवाईक अमित रणदिवे यांच्याकडे हा फोन सोपविला.