नवी मुंबई: शालेय साहित्य साहित्य खरेदीसाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन दुकानदाराने केले. याबाबत तिने पालकांना सांगताच पालकांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनीही तात्काळ कारवाई करीत दुकानदारांना बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली आहे. 

तुर्भे येथे राहणारी एक अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेने दिलेल्या प्रकल्पासाठी आवश्यक साहित्य खरेदी साठी तुर्भे सेक्टर-२२ येथील एका स्टेशनरी दुकानात गेली होती. त्या वेळी रमेश गाला हा दुकानात उपस्थित होता आणि त्याने विद्यार्थिनीला चुकीच्या उद्देशाने स्पर्श केला. विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली, त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली, त्यानुसार पोलिसांनी कलम विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करीत आरोपी गाला याला अटक करण्यात आली आहे.  यापूर्वीही अन्य एका अल्पवयीन मुलीवर असेच कृत्य केल्याची तक्रार करण्यात आली होती. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर दहाने यांनी दिली. 

Pune, Citizens rewarded, missing school girl,
पुणे : बेपत्ता शाळकरी मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांना पोलीस आयुक्तांकडून बक्षीस
Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
mumbai crime news, mumbai rape news
मुंबई: अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरूणाला अटक