the-street-lights off at Navi Mumbai Uran-Panvel connecting Gavan flyover navi mumbai | Loksatta

नवी मुंबई, उरण -पनवेलला जोडणाऱ्या गव्हाण उड्डाणपूल अंधारात

उड्डाणपूलावरील अंधारामुळे अनेक वेळा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

नवी मुंबई, उरण -पनवेलला जोडणाऱ्या गव्हाण उड्डाणपूल अंधारात
गव्हाण उड्डाणपूल अंधारात

जेएनपीटी बंदरातील वाढत्या वाहनांसाठी नवी मुंबईसह उरण पनवेलला जोडणाऱ्या गव्हाण पुलाची उभारणी करण्यात आली असून या मार्गावरील सर्वात अधिक मार्गिका असलेल्या पुलावरील पथदिवे बंद असल्याने पुलावर अंधार पसरला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांना अंधाऱ्या पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

हेही वाचा- दूकान चालवायला देणे व्यापाऱ्याला पडले महागात; १३ वर्षात १ कोटी ३५ लाखांचा अपहार

यापूर्वी या मार्गावरून जाणारे कंटेनर वाहन ५० पेक्षा अधिक फूट खाली कोसळून अपघात झाला होता. या गंभीर अपघातात वाहनचालकांला आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच कंटेनरमधील किंमती मालाचेही नुकसान झाले होते. नागरिकांचा प्रवास जलद गतीने व्हावा या करीता जेएनपीटी ने २ हजार ६०० कोटी रुपये खर्च केला आहे. त्यातून जेएनपीटी ते पळस्पे हा पुणे व गोवा महामार्गाला जोडणारा तर जेएनपीटी ते नवी मुंबई हा ठाणे ,दिल्ली महामार्गाला जोडणारा असे दोन सहा व आठ पदरी राष्ट्रीय महामार्ग उभारले आहेत.

हेही वाचा- उरणचे प्रवेशद्वार असलेला चारफाटा पुन्हा अंधारात; नागरिकांची गैरसोय

या महामार्गावरील गव्हाण फाटा हे महत्वाचे ठिकाण असून दोन्ही महामार्ग गव्हाण येथे मिळतात. त्यामुळे गव्हाण उड्डाणपूलावर वाहनांची सततची वर्दळ सुरू असते. त्याचप्रमाणे उड्डाणपूलाचा वापर करून वाहनांना मार्गही बदलावा लागतो. त्यासाठी पुलावर विजेचे दिवे असणे आवश्यक आहे. मात्र गव्हाण या वाहतुकीसाठी महत्वाच्या असणाऱ्या उड्डाणपूलावरील वीज अनेकदा गायब असते. याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. पुलावरील अंधारामुळे मोठ्या अपघाताचीही शक्यता आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दूकान चालवायला देणे व्यापाऱ्याला पडले महागात; १३ वर्षात १ कोटी ३५ लाखांचा अपहार

संबंधित बातम्या

गोष्टी गावांच्या : भैरीनाथाचे गाव
आगरी-कोळी संस्कृती भवन कागदावरच
पनवेल महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ भारत’ सर्वेक्षणच्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडरपदी दिलीप वेंगसरकर आणि गायक सागर म्हात्रे
नवी मुंबईतील माजी नगरसेवकावर फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळीचा गुन्हा दाखल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती