पनवेल: नवीन पनवेल उपनगरातील रेल्वेरुळाला खेटून असणा-या झोपडपट्टीलगतची जलवाहिनी मागील २४ तासांपासून फुटून त्यामधून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. एकीकडे मागील दोन दिवसांपासून सिडकोच्या विविध उपनगरांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद आहे. रहिवाशांवर पिण्याच्या पाण्याची सीलबंद बाटला खरेदी करण्याची वेळ आल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

नवीन पनवेल येथील पंचशील नगर झोपडपट्टीलगत असणा-या एमजेपीची १३०० मीलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा फवारा या परिसरात उडाला आहे. मागील २४ तासांपासून हा णी फवारा सूरु असल्याने जलवाहिनी लगतच्या झोपड्यांंमध्ये पाणी शिरले आहे. दिड फुटापेक्षा अधिक पाणी या झोपड्यांमध्ये असल्याने या झोपड्यांमधील रहिवाशी पाण्यातच बुधवारी सायंकाळपासून वास्तव्य करत आहे. एमजेपी प्रशासनाने सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस ३६ तासांचा शटडाऊन घेऊन विविध दुरुस्तीची कामे केली.

हेही वाचा… १९ कोटींच्या खर्चानंतरही मोरा – मुंबई जलप्रवाशांना पार करावी लागणार अडथळ्यांची शर्यत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र पुन्हा जलवाहिनीतील पाण्याचा दाब वाढण्यासाठी अजून दोन दिवस लागणार आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत सिडकोच्या कळंबोली, नवीन पनवेल, काळुंद्रे, करंजाडे, खांदेश्वर वसाहत या परिसरात पाणी पुरवठा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र गुरुवारी दुपारपर्यंत वसाहतींमध्ये काही मिनिटेच पाणी पुरवठा झाला.