नवी मुंबई : २९ तारखेला  महापारेषण कंपनीची ४०० केव्ही  कळवा-खारेगाव लाईनची उंची वाढविण्याचे काम होणार आहे. सदर काम अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे ऐरोली-काटई महामार्गाचे काम ऐरोली मधील युरो स्कूल समोरील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे.

सदर कामामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वरील काम करण्याचे महापारेषणने दिनांक २९ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित केले आहे. हे काम, पहाटे ५.०० वाजतापासून सुरु होईल व दुपारी २. ०० वाजेपर्यंत संपेल. त्यामुळे या कालावधीत ऐरोली गाव, ऐरोली भक्ती पार्क, ऐरोली नाका, साईनाथवाडी , नेव्हागार्डन ,शिव कॉलनी , समतानगर, या ठिकाणचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

आणखी वाचा-वाशीतील सतरा प्लाझा परिसरात पालिकेची तोडक कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐरोली मधील इतर ठिकाणचा वीज पुरवठा पर्यायी व्यवस्था करून चालू केला जाईल असे कार्यकारी अभियंता  मोहोड यांनी सांगितले आहे . तरी वीज पुरवठा बंद राहणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांनी याची नोंद घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात येत आहे