पनवेल: महापालिकेच्या गोदामावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. याबाबत रितसर पालिकेच्या आरोग्य निरिक्षकांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पालिकेने कीटक नियंत्रणासाठी एक लाख रुपयांची किटकनाशके चोरली आहेत.

पनवेल महापालिकेच्या कार्यालयापासून पाच मिनिटांवर जेष्ठ नागरीक सभागृह आहे. या सभागृहातील पाठीमागील बाजूस असणा-या गोदामात पालिकेने किटक नियंत्रणासाठीची खरेदी केलेली औषधे ठेवलेली असतात. या गोदामातून सायफ्ल्यूथ्रीन नावाचे १ लाख ११ हजार रुपयांंचे किटकनाशक चोरट्यांनी गायब केले.

हेही वाचा… पनवेल महापालिकेतील औषधनिर्माता पदांसाठी सहा उमेदवार पात्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेचे आरोग्य निरिक्षक संजय जाधव यांनी याबाबत रितसर तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. यापूर्वी जेष्ठ नागरिक सभागृहाशेजारील पालिकेने सामान्यांसाठी खर्च करुन बांधलेल्या सार्वजनिक शौचालयातील नळ चोरीच्या घटना घडल्या. पालिका आणि पोलीसांनी भूरटे चोर लहान चोरी समजून अशा चो-यांकडे दुर्लक्ष केले. कोणतेही शिक्षा होत नसल्याने चोरट्यांची मजल पालिकेच्या गोदामापर्यंत गेल्याचे बोलले जात आहे.