नवी मुंबई शहराला लाभलेला खाडी किनार आणि जैवविविधता यांची महिती उपलब्ध होण्यासाठी ऐरोलीमध्ये किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात आले आहे. पक्षप्रेमींना फ्लेमिंगो पक्षी पाहता यावे त्यासाठी या परिसरात बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. परंतु या केंद्रात अद्याप फ्लेमिंगो दाखल झाले असली तरी बोटिंग सुरू करण्यात आलेली नाही. बेलापूरमध्ये पहिल्यांदा नव्याने फ्लेमिंगो बोट २ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक ऐरोली येथील बोटींग सफरीच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई महापालिकेचा गोवरच्या प्रभाव प्रतिबंधासाठी सर्वेक्षण, लसीकरणावर भर

नवी मुंबईसह, ठाणे, मुंबईतील पर्यावरण प्रेमींना खाडी किनाऱ्यांचे महत्त्व कळावे तसेच जैवविविधतेची माहिती व किनाऱ्यांचे संरक्षण कसे करावे याबाबत माहिती मिळावी म्हणून पक्षीनिरक्षण आणि बोटींग सुरू करण्यात आली आहे. ठाणे ही आशिया खंडातील सर्वात मोठी खाडी आहे. २६ किलोमीटरच्या खाडी परिसरामध्ये २०० पेक्षा जास्त पक्षी स्थलांतर करीत असतात. फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षीही खाडी किनाऱ्यावर प्रत्येक वर्षी आश्रयाला येतात. बोटीने खाडीकिनारी सफर ही नोव्हेंबर महिन्यात सुरू होणे अपेक्षित होते,परंतु अद्याप थंडीचा मौसम कमी असल्याने फ्लेमिंगो चे आगमन उशिराने झाले आहे. परंतु ऐरोली येथील बोटिंग सफर अद्याप सुरू झाली नसून बेलापूर येथे बोटिंग सुरू आहे. त्यामुळे पर्यटक लवकर बोटिंग सफर सुरू होण्याच्या प्रतीक्षेत पर्यटक आहेत.

हेही वाचा- नवी मुंबईत स्वच्छ भारत अंतर्गत करण्यात येणारे रंगकाम निकृष्ट दर्जाचे; अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐरोली खाडीकिनारी फ्लेमिंगो दाखल झाले आहेत बोटिंग सफर सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू असून पुढील परवानगीसाठी प्रलंबित आहे लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती ऐरोली सागरी जैवविविधता केंद्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे यांनी दिली.