पनवेल : मुंबई गोवा महामार्गावर रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून वाहनांतील प्रवाशांना अनेक तासांच्या कोंडीचा सामना करावा लागला. महामार्गावर सुरू असलेले काँक्रिटीकरणाचे काम त्यामुळे अरुंद बनलेल्या महामार्गावरील खड्ड्यांमुळे, तसेच एकाच वेळी हजारो वाहने आल्याने कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील एक मार्गिका पळस्पे ते इंदापूरपर्यंत कॉंक्रिटची करू हे आश्वासन दिले होते. मात्र मंत्र्यांचे हे आश्वासन खोटे ठरल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी केला. वडखळ येथील वाहतूक कोंडीच्या छायाचित्रात एका मार्गिकेचे काम सुरू असून खड्डेमय रस्त्यातून वाहतूक ठप्प झाल्याचे दिसत होते. मनसेचे प्रवक्ता योगेश चिले यांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहन कोंडीची अनेक छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून मंत्री चव्हाण हे खोटारडे असल्याची बोचरी टीका केली.

हेही वाचा – नवी मुंबई : ‘इंडियन स्वच्छता लीग २.०’ अंतर्गत सफाईमित्रांनी जल्लोषात फोडली स्वच्छतेची इकोफ्रेंडली दहीहंडी

हेही वाचा – उरण शहरातील कोंडीचा गणेशमूर्ती नेतानाही फटका; उत्सव काळात शहरातील कोंडीत वाढ ,नियोजनाचा अभाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन दिवसांत मुंबई गोवा महामार्गावरून राज्य परिवहन मंडळाच्या ३२०० हून अधिक बसगाड्या धावणार आहेत. तसेच तीन दिवसांत ३० हजारांहून अधिक हलकी वाहने कोकणात जाणार आहेत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्याच्या वाहतूक पोलिसांनी संबंधित वाहनताणाचा विचार करून शीव पनवेल आणि पनवेल ते पळस्पे तसेच पळस्पे ते वडखळ, वडखळ ते महाड या महामार्गावर पोलीस बंदोबस्तासोबत क्रेन, रुग्णवाहिका आपत्तीवेळी मदतकार्यासाठी उभ्या केल्या आहेत. शनिवारी सायंकाळ ते मध्यरात्री व पहाटेपर्यंत शीव पनवेल, पळस्पे या दरम्यान महामार्गावर हजारोंच्या संख्येने वाहनांचा ताण वाढला होता. स्वत: नवी मुंबई पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे हे बंदोबस्तासाठी उपस्थित होते. नवी मुंबई ते पळस्पे या दरम्यान वाहतूक संथगतीने सुरू होती. रविवारी सकाळी वडखळ येथील वाहतूक कोंडीत वाहने अडकल्याने प्रवासी हैराण झाले होते.