scorecardresearch

नवी मुंबई : घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना अटक; ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

तळोजा पोलीस ठाणे हद्दीमध्ये १ मार्चला रामदास पाटील यांच्या घरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे रोख रक्कम व सोन्याचे गंठण असा एकूण ७ लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरी केली होता.

Two person arrested house robbery Taloja
घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना अटक; ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नवी मुंबई : तळोजा पोलीस ठाणे हद्दीमध्ये १ मार्चला रामदास पाटील यांच्या घरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे रोख रक्कम व सोन्याचे गंठण, असा एकूण ७ लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरी केली होता. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद होता. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीमधील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत तपासाची चक्रे फिरत होती. कक्ष ३ गुन्हे शाखेकडून घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू होता. दरम्यान फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून ठिकठिकाणचा डंपडाटा घेवून केलेल्या तांत्रिक तपासामधून मिळालेल्या माहितीवरून कक्ष ३ गुन्हे शाखेच्या तपास पथकाने मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर या परिसरात आरोपींचा शोध सुरू केला. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये कक्ष ३ गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी सुमित भगवान शेळके (वय २४ रा. गांधीपाडा अलिबाग, सध्या रा. लक्ष्मी कसबे चाळ, कुर्ला पश्चीम, मुंबई) आणि श्रीनाथ सदाशिव वाघमारे (वय २५ रा. जि. सोलापूर सध्या राहणार शहीद भगतसिंग नगर, वडाळा पुर्व, मुंबई) यांना १० तारखेला अटक केली. अटक करून तपास केला असता सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे. नमुद आरोपींना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर आहे.

हेही वाचा – जेएनपीटी- पळस्पे राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलर उलटला; वाहनाखाली आल्याने एकाचा मृत्यू 

हेही वाचा – नवी मुंबईत व्हायरल तापाची साथ, बाह्यरुग्णांत ५०% रुग्ण ताप, सर्दी, खोकल्याचे

आरोपींचा पूर्व इतिहास पडताळला असता सुमितवर नागोठणे, सातपाटी, केलवा, अलिबाग, दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून चोरीचा १०० टक्के ऐवज जप्त करण्यात आलेला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 12:56 IST
ताज्या बातम्या