आनंद दिघे स्मरणार्थ आयोजित धर्मवीर चषक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमास नवी मुंबईत आले होते.त्यावेळी त्यांनी विरोधकांना इशारा देत फ्रेब्रुवारी पर्यंत काय करायचे ते करा त्या नंतर आमचेच सरकार आहे असा विश्वास दर्शीवला.
काय झाडी, काय मैदान, काय शिवसैनिक ! इकडे सगळे ओके तिकडे मात्र फक्त खोके अशा वाक्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या स्टाईलने आपल्या भाषणाची सुरवात केली. उद्या नागपूरला जाणार तेथे खूप बॉम्ब फोडणार.असा इशारा त्यांनी दिला. वाघाचे काळीज असलेला शिवसैनिक आहे. तुम्हाला पेलणार नाही जमलेली गर्दी खोके देऊन जमवलेली नाही.शिवसैनिकांचा एक हात तलवारीवर दुसरा मृत्यूच्या खांद्यावर असते.
सत्ताधारी पक्षांना त्यांनी धारेवर धरत सोडणार नसल्याचा इशारा दिला. फेब्रुवारी पर्यंत काय करायचे करून घ्या त्या नंतर तुम्ही राहणार नाही. सरकार अलिबाबा चालीच चोर असून लवकरच अलिबाबा जाणार आणि चाळीस चोरही. पुढचा मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच असणार आणि तेही उद्धव ठाकरे असणार. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा बदला घ्यायचाय.अशा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला.
मला तुम्ही तुरुंगात टाकले. तुम्हाला वाटले तुरुंगात टाकल्यावर गप्प बसेल , मात्र हा कट्टर शिवसैनिक आहे दबणार नाही. असे सांगत त्यांनी मनातील सल बोलून दाखवली. तुम्ही मला तुरुंगात ज्या खोलीत ठेवले त्याच खोलीत तुम्हाला ही ठेवणार . फायलीही तयार आहे आम्ही बदला घेतल्या शिवाय स्वस्त बसणार नाही. तुम्ही पाठीत खंजीर मारला आम्ही पुढून खुपसणार . अशी जाहीर धमकीच दिली. या वेळी पारितोषिक वितरण पूर्वी राऊत यांच्या हस्ते कोपरखैरणे घणसोली भागातील सात शिवसेना शाखांचे उद्धाटन झाले. यावेळी स्थानिक नेते व खासदार राजन विचारे उपस्थित होते.