उरण : उरण-पनवेल मार्गावरील उरण शहराजवळील कोट नाका येथील पूलदुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याने हा मार्ग खुला होण्यासाठी आणखी २१ दिवस लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांना अरुंद आणि कच्च्या मार्गानेच पुढील काही दिवस प्रवास करावा लागणार आहे.

कोट नाका भागातील आनंदी हॉटेलजवळच्या पुलाची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे प्रस्तावित बाह्यवळण ते कोट नाकादरम्यानचा मुख्य मार्ग बंद करण्यात आला आहे. तर पर्यायी रस्ता म्हणून कच्च्या बाह्यवळण मार्गाने दुचाकी आणि रिक्षाने प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा : नवी मुंबई: एका दिवसात ३० ते ५० टक्के परतावा… जास्त परताव्याच्या आमिषापोटी १८ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्य रस्ता बंद झाल्याने उरण शहरात ये-जा करणाऱ्या वाहनांना आणखी एक पर्यायी मार्ग बोकडवीरा ते शेवा उड्डाणपूल मार्गे प्रवास करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्या आहेत. मात्र, दररोज सकाळी आणि सायंकाळी या मार्गावर वाहतूक कोंडी होते.