नवी मुंबई : अमृत महोत्सवानिमित्त १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत वर्धक मात्रा देण्यासाठी नवी मुंबईत दोन मॉल व सात डीमार्टमध्ये लसीकरणासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. आता डीमार्टमधील लसीकरण बंद करण्यात आले असून मॉलमध्ये फक्त शनिवारी व रविवारी लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेची वाशी, नेरुळ, ऐरोली, बेलापूर, तुर्भे येथील रुग्णालये, कामगार विमा रुग्णालय तसेच २३ नागरी आरोग्य केंद्रांत लसीकरणाची ही जनअभियान योजना राबवण्यात आली. यात एकूण २१ हजारांपेक्षा अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. नवी मुंबईत १८ वर्षांवरील १०० टक्के नागरिकांचे दोन्ही लसमात्रांचे राज्यात सर्वात प्रथम १०० टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरण मोहीम देशात सुरू झाल्यानंतर बहुतांश नागरिकांनी पहिली व दुसरी लसमात्रा घेतली आहे. परंतु वर्धक मात्रा घेण्याकडे दुर्लक्ष झाले होते. या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून शहरातील दोन मॉल तसेच ७ डीमार्टमध्ये १८ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी ही लसीकरण मोहीम सुरू होती. आठवड्यातील शनिवारी व रविवारी मॉल व डीमार्टमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत होता. शनिवार व रविवारी सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत लसीकरण मोहीम राबवण्यात येत होते तर सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये दुपारी ३ ते ९ या वेळांमध्ये लसीकरण केले जात होत होते.

नवी मुंबई महापालिकेने शहरातील दोन मॉल व ७ डी मार्ट येथे २३ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत विशेष लसीकरण मोहीम राबवली. त्यात २१ हजारांहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले. मॉलमधील लसीकरण फक्त दुपारनंतर सुरू राहील. तर डीमार्टमध्ये आता लसीकरण होणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख, महापालिका