नऊ टक्के लसीकरण शिल्लक; १५ ते १८ वयोगटातील ८८ टक्के मुलांना लस

नवी मुंबई : शहरात करोना प्रतबिंधक लसीकरणाला गती आली असून दोन्ही लस मात्रा घेतलेल्यांची संख्या  दहा लाखांपेक्षा अधिक झाली आहे. संपूर्ण लसीकरणासाठी नऊ टक्के लसीकरण शिल्लक आहे. नवी मुंबईत गेल्या वर्षी लसीकरण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत २३ लाख २२ हजार लसमात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत.  त्यात १३ लाख जणांना पहिली लसमात्रा तर १० लाख १३ हजार जणांना दोन्ही लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे दुसऱ्या मात्रेचे लसीकरण ५० टक्केपर्यंतच झाले होते. दरम्यान, शहरात ओमायक्रॉन व करोना रुग्णवाढ सुरू झाल्यानंतर ओस पडलेल्या लसीकरण केंद्रांवर पुन्हा गर्दी होऊ लागली. त्यामुळे लसीकरणास गती मिळाली. ५० ते ५५ टक्केवर अडकलेले दुसऱ्या मात्रेचे लसीकरण महिनाभरात ९१ टक्केपर्यंत गेले आहे.  दुसरीकडे १५ ते १८ वयोगटातील ८८ टक्के मुलांना पहिली लसमात्रा देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेचा लसीकरणाचा वेग चांगला आहे. दोन्ही लसमात्रा घेतलेले ९१.५६ टक्के नागरिक झाले आहेत. फक्त ९ टक्के नागरिकांनी दुसरी लसमात्रा अद्याप घेतलेली नाही.  नागरिकांनी संपूर्ण लससंरक्षित होऊन पालिकेला सहकार्य कराव, असे आवाहन पालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी केले आहे.