स्वच्छ भारत मिशनअंतर्गत नगरविकास मंत्रालयाच्या सुचनेनुसार १ ते १५ मार्च या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालय व इमारतींमध्ये विशेष स्वच्छता अभियान मोहीम राबिवण्यात आले. सेक्टर ३ वाशी येथील पोलीस स्टेशन हे या अभियानात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शासकीय कार्यालय ठरले आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील २६ शासकीय कार्यालयांनी या अभियान मोहिमेत भाग घेतला. मोहिमेअंतर्गत मूल्यांकन करण्यासाठी दिलेल्या १३ निकषांच्या अनुषंगाने मूल्यांकन समितीने मूल्यांकन केले होते.
या शासकीय कार्यालयाच्या विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये वाशी पोलीस स्टेशनचा प्रथम क्रमांक, कोकण रेल्वे कार्यालयाचा द्वितीय क्रमांक, तर स्थानिक संस्था कर कार्यालय कोपरखरणे यांचा तृतीय क्रमांक त्याचसोबतच कोकण विभागीय आयुक्तालय कोकण भवन यांचे कार्यालय व कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य प्रशासकीय कार्यालय सेक्टर १९ यांना उत्तेजनार्थ क्रमांक घोषित केला आहे.
विशेष स्वच्छता मोहितेअंतर्गत सहभागी झालेल्या २६ कार्यालयांचे मूल्यांकन करताना कार्यालयात पुरुषांकरिता व महिलांकरिता शौचालय, साफसफाई, इमारतीच्या आवारातील परिसर, अशा १३ निकषांच्या साहाय्याने मूल्यांकन समितीने परीक्षण केले.
यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेने वाशी येथील ई.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र या सर्व निकषांतर्गत सर्व क्रमांकावर येत असूनही त्यांची पारितोषिकासाठी निवड जाहीर न करता इतर शासकीय कार्यालयांना पारितोषिकांसाठी संधी देण्यात आल्याची माहिती महापौर सुधाकर सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.