आवक घटल्यामुळे अनेक भाज्यांचे दर शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहेत. केरळमधून येणारी फरसबी घाऊक बाजारात ४५ ते ५० रुपये किलो आहे. हिरव्या वाटाण्याचा सध्या हंगाम नाही. कर्नाटकमधून येणाऱ्या या वाटाण्याने वर्षांतील सर्वाधिक दर घेतला असून तो एपीएमसी बाजारात ७० ते ८० रुपये किलो विकला जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात तो मिळणे दुरापास्त झाले आहे. हॉटेलमध्ये सर्रास लागणारा हा वाटाणा किरकोळ बाजारात काही ठिकाणी १०० रुपये किलोने विकला जात आहे. ढोबळी, शिमला, आणि हिरवी या तीन मिरच्यांच्या दरात आणखी तिखटपणा आला आहे. त्यामुळे या तीनही भाज्या खुल्या बाजारात ६० ते ७० रुपये प्रति किलोने विकल्या जात आहेत. त्यातल्या त्यात दुधी भोपळा, फ्लॉवर, गाजर, काकडी, कोबी, रताळी, तोंडली, वांगी या भाज्या स्वस्त म्हणजे घाऊक बाजारात २० रुपये किलोपेक्षा कमी दरात विकल्या जात आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात त्या ३० ते ४० रुपयापर्यंत विकल्या जात आहेत.
टोमॅटोची शंभरी : मुंबई बाजारात दररोज सरासरी ६० ते ७० गाडय़ा भरून टोमॅटोची आवक होत असते. मात्र, नारायणगाव, जुन्नर यांसारख्या भागात होणारे टोमॅटोचे उत्पादन ७० टक्क्य़ांनी कमी झाल्याने वाशी बाजारात जेमतेम २५ गाडय़ा येत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाव १०० रूपयांवर गेला आहे.
रुपये प्रति किलो
वाटाणा- ७० ते ८०
हिरवी मिरची- ६० ते ६५
ढोबळी मिरची – ५५ ते ५६
सिमला मिरची ५० ते ६०
शेवगा ४५ ते ५०
गवार ४० ते ५०
फरसबी ४५ ते ५०
शिराळा ४४ त ५५
भेंडी ३८ ते ४०
कारली ३२ – ४०रु
सुरण ३४ ते ३६रु
आले ३२ ते ४२रु
कोबी २० ते २२रु
काकडी १८ ते २०रु
गाजर १२ ते १४रु
प्लॉवर १४ ते १८रु
