नवी मुंबई : गटाराच्या पाण्यात एक भाजीविक्रेती महिला भाज्या धुत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात वायरल होत आहे. या किळसवाण्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील तुर्भे भागात घडला आहे.

नवी मुंबई येथील तुर्भे शहरात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानीखालील रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही भाजी विक्रेती महिला गटाराच्या पाण्यात भाज्या धुत असल्याचा व्हिडीओ एका अज्ञात व्यक्तीने काढला आहे. हा व्हिडीओ त्या व्यक्तीने सोशल मिडीयावर पोस्ट केल्यामुळे तो चांगलात व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. तसेच स्थानिक रहिवाशांनी याबाबत रोष व्यक्त करत, अशा प्रकारच्या कृत्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भाज्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. काही दिवसापूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यात एक केळीवाला रस्त्यावरील पाण्यात पडलेली केळी पुन्हा उचलून विक्रीसाठी ठेवत होता. तर, लिंबू सरबत, पाणी पुरीवाल्याचाही धक्कादायक व्हिडीओ व्हायरल यापूर्वी व्हायरल झाला होता.

त्यामुळे विक्रेत्यांचे असे किळसवाणी प्रकार म्हणजे सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे. दरम्यान, नागरिकांनी अशा प्रकारच्या भाज्यांची खरेदी करताना अधिक सतर्क राहावे, तसेच भाज्या घरी आणल्यानंतर त्या स्वच्छ पाण्याने नीट धुवूनच वापराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा शंका उपस्थित झाल्या आहेत. थोड्या पैशांच्या लालसेपोटी सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.