झोपडपट्टी भागांत आठवडय़ातून तीनच दिवस पुरवठा
खालापूर येथील मोरबे धरणावर सर्वस्वी अवलंबून असणाऱ्या नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाणीटंचाई हळूहळू वाढू लागली असून शहरी भागात यापूर्वी होणारा सहा तासांचा पाणीपुरवठा आता केवळ चार तास होऊ लागला आहे. यात सकाळी दोन व संध्याकाळी दोन तासाची वेळ आहे. औद्योगिक व झोपडपट्टी भागात तर आठवडय़ातून केवळ तीन दिवस पाणी येत आहे. दरम्यान दिघा येथील ब्रिटिशकालीन रेल्वे धरणातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने धुणी आणि भांडय़ासाठी टँकरने दिले जात आहे.
चोवीस तास मुबलक पाणी वापरण्याची सवय लागलेल्या नवी मुंबईकरांना यंदा पाणीटंचाईची चांगलीच झळ बसली आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून थोडी थोडी पाणी कपात पालिकेने सुरू केली होती. ती आता ३३ टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. मोरबे धरणातील पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल अशी खात्री पालिका प्रशासन देत असले तरी नसती जोखीम नको म्हणून आतापासून पालिकेने ही पाणी कपात वाढवली आहे. त्याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही; पण दिवसातून सहा तास होणारा शहरी भागातील पाणीपुरवठा थेट चार तासांवर आणण्यात आला आहे.
मोरबे धरणातील अगोदरच पाणीसाठा कमी असताना बाष्पीभवनाने धरणातील पाणी काही प्रमाणात कमी होत आहे. त्याचा परिणामही पाणी साठय़ावर होऊ लागला असून यंदा पाऊस लवकर पडणार असल्याचे भाकीत करण्यात आल्याने पालिकेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. पाण्याची ही कसरत आणखी १५ दिवस करावी लागणार असल्याचे स्पष्ट दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळी सहा ते नऊ या तीन तासांसाठी येणारे पाणी आठ वाजेपर्यंत सुरू आहे. त्यानंतर संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत पुरवठा केला जात आहे. या वेळा प्रत्येक शहरासाठी वेगवेगळ्या असून पुरवठय़ाची सुरुवात ऐरोली भागाकडून केली जात आहे.

३३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी कपात पालिकेने सुरू केली आहे.
०६ तासांचा पाणीपुरवठा आता केवळ चार तास होऊ लागला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water crisis deepens in navi mumbai
First published on: 24-05-2016 at 05:03 IST