मोरबे धरणात ५ ऑगस्ट पर्यंतच पुरेल इतकाच ३९.३६ % पाणीसाठा ,आजपासून शहरात पाणीकपात

नवी मुंबई – जलसंपन्न महापालिका म्हणून नावलौकीक असलेल्या महापालिकेवरही यावेळी पाणी कपातीचे संकट आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार लांबणीवर पडणारा पाऊस व पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने पालिकेने पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन करण्याचे सूचित केल्याप्रमाणे पालिकेने नियजन केले असून विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा न करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून ही पाणी कपात व पाणीपुरवठ्याच्या नियोजनाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. यंदा धरण क्षेत्रात कमी पावसाची नोंद झाल्याने मोरबे धरण पूर्णपणे भरले नव्हते. दिवसेंदिवस नवी मुंबई शहरातील पाण्याचा वापरही वाढत असून धरण पूर्ण भरले नसल्याने यावेळी अवघा ३९.३६ टक्केच टक्के पाणीसाठा शिल्लक असून ९ ऑगस्ट पर्यंत पुरेल इतकाच पाण्यासाठी मोरबे धरणात उपलब्ध आहे . त्यामुळे नवी मुंबई शहरात पाणी कपात होणार असून शुक्रवारपासूनच पाणीकपात केली जाणार आहे.

या दिवशी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही….
सोमवार- बेलापूर
मंगळवार- कोपरखैरणे
बुधवार- घणसोली
गुरुवार- वाशी
शुक्रवार- ऐरोली
शनिवार- नेरुळ
रविवार- तुर्भे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी शहरात प्रत्येक विभागात आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तरी नागरीकांनी पाणी जपून वापरावे व पालिकेला सहकार्य करावे. – राजेश नार्वेकर, आयुक्त नवी मुंबई महापालिका