लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या दुरुस्ती कामामुळे गेल्या तीन दिवसांपासून सिडको क्षेत्राचा पाणीपुरवठा रडतखडत सुरू असतानाच बुधवारी सकाळी भगारी आणि नवीन पनवेल भागात दोन ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने पुन्हा एकदा सहा तास पाणीपुरवठा खंडित करण्याची वेळ पाणीपुरवठा यंत्रणांवर ओढावली. त्यामुळे खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे, काळुंद्रे या वसाहतींमधील रहिवाशांना अभूतपूर्व अशा पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून गुरुवारी पूर्ववत केला जाणारा पाण्याचा पुरवठा सुरळीत होण्यास शुक्रवार, शनिवार उजाडणार असल्याचे सांगण्यात येते.

पुणे: शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांची होणार स्वच्छता, हे आहे कारण !
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
New Tansa water pipeline commissioned
नवीन तानसा जलवाहिनी कार्यान्वित, बाधित परिसरातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने
in pune one killed and one injured in rickshaw-dumper collision
पुणे : रिक्षा-डंपरच्या धडकेत एक ठार, एक जखमी
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
water supply cut in mumbai news
मुंबईत बुधवारी, गुरुवारी पाणीपुरवठा बंद
Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा तसेच न्हावाशेवा या भागातील केंद्रावर पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर सिडकोमार्फत वेगवेगळ्या उपनगरांमध्ये पाण्याचा पुरवठा केला जातो. सिडकोच्या अखत्यारीत येणारी बहुसंख्य उपनगरांमधील नागरी सुविधा पनवेल महापालिकेकडे वर्ग झाल्या असल्या तरी पाणीपुरवठा यंत्रणा अजूनही सिडकोमार्फत राबवली जाते. या वितरण व्यवस्थेतील विस्कळीतपणामुळे सिडको वसाहतींमधील रहिवाशी अक्षरश: मेटाकुटीस आले असून वारंवार पाणीपुरवठा खंडित होणे तसेच पुरेसा दाब नसणे यांसारख्या तक्रारी आता नित्याच्या होऊ लागल्या आहेत.

आणखी वाचा-पनवेल शहरात एकाच रात्री सात दुकाने फोडली

सिडकोकडून प्रामुख्याने कळंबोली, नवीन पनवेल, खांदेश्वर वसाहत, काळुंद्रे आणि करंजाडे या वसाहतींमध्ये पाण्याचा पुरवठा केला जातो. जीवन प्राधिकरणामार्फत रसायनी येथील पाताळगंगा नदीवरील पाणी सिडको महामंडळाच्या पाणीपुरवठा विभागाला पुरविते. मात्र ही जलवाहिनी जीर्ण झाल्याने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. जलवितरण व्यवस्थेतील काही कामांसाठी सोमवार, मंगळवार असा ३६ तासांचा शटडाऊन सिडको वसाहतींमध्ये यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता. या वेळापत्रकाच्या अनुषंगाने सिडकोने कमी प्रमाणात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे सिडको वसाहतींमध्ये अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून कमी दाबाने तसेच काही ठिकाणी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.

काही भागांत टँकरचा पुरवठा

दरम्यान या काळात सिडकोकडून सात ठिकाणी पाण्याचे टँकर तैनात ठेवण्यात आले होते. पाणीपुरवठा अत्यंत कमी होत असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या मागणीनंतर सिडको महामंडळ १२० रुपये आकारून एक टँकर पिण्याच्या पाणी पुरवीत आहे. सिडकोकडून वाहतुकीचा खर्च रहिवाशांकडून आकारला जात नव्हता. सिडको मंडळाच्या स्थानिक वसाहत कार्यालयात याबाबत तक्रार केल्यानंतर तेथील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी खात्री केल्यानंतर संबंधित गृहनिर्माण संस्थेला टँकरने पाणीपुरवठा करतात अशी ही योजना आहे. खासगी टँकर या परिसरात दीड ते दोन हजार रुपयांना मिळत होता.

आणखी वाचा-अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई; २०२२ मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशाची बजावणी ११ महिन्यांनी

स्मशानभूमीतही पाण्याची झळ

गुरुवारी सकाळी कळंबोली येथे राहणाऱ्या ७८ वर्षीय पार्वती चांदिवडे यांचे निधन झाल्याने त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी कळंबोली येथील स्मशानभूमीत आणले होते. त्यांचे वारसदार प्रकाश चांदिवडे यांना हात-पाय धुण्यासाठी थोडेसे पाणी मिळाले. मात्र अंगावर घेण्यासाठी पाणी मिळू शकले नाही. स्मशानभूमीमध्ये विविध कामे सुरू आहेत. मागील ३६ तासांच्या जलवाहिनीवरील शटडाऊनमुळे येथील टाकीतील पाणी संपले होते. अखेर चांदिवडे यांच्या नातेवाईकांनी खरेदी करून २० लिटर पाण्याचा बाटला आणून त्याद्वारे पुढील विधी आटपला.

जलवाहिनीचे निम्मे काम शिल्लक

सिडकोने जाहीर केलेला ३६ तासांचा शटडाऊन संपून बुधवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित धरण्यात आले होते. प्रत्यक्षात कळंबोली, नवीन पनवेल, खांदा कॉलनी या भागांतील अनेक सेक्टरमधील पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता. गुरुवारपासून हा पुरवठा सुरळीत होईल, अशी रहिवाशांना अपेक्षा होती. नवी जलवाहिनी टाकण्याचे निम्मे काम शिल्लक असून यासाठी पुढील काळातही शटडाऊन घ्यावे लागणार आहेत.

आणखी वाचा-नवी मुंबईत डेंग्यू संशयितांमध्ये वाढ

दरम्यान, नव्या आणि जुन्या अशा दोन्ही जलवाहिन्यांचा व्यास कमीजास्त असल्यामुळे पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर पाण्याचा दाब जुनी जलवाहिनी पेलू शकली नाही. त्यामुळे बुधवारी दोन ठिकाणी जलवाहिनी फुटली. अखेर गुरुवारी दुपारी साडेबारा वाजल्यानंतर पुन्हा सहा तासांचा दुरुस्तीसाठी शटडाऊन घेऊन जलवाहिनी पूर्ववत करण्याचे प्रयत्न जीवन प्राधिकरणाने सुरू केले. याचा फटका कळंबोली, करंजाडे, खांदेश्वर आणि नवीन पनवेल या वसाहतींमधील रहिवाशांना बसला.

नवीन पनवेल येथील पंचशीलनगर झोपडपट्टीलगत जलवाहिनीला गळती लागल्याचे समजले. झोपडपट्टीधारकांकडून येथे काम करू दिले जात नाही. त्यामुळे हे काम करणे कठीण होते. यासंबंधी पनवेल महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. -विजय सूर्यवंशी, अभियंता, एमजेपी

आंदोलनानंतरही पाणीटंचाई मिटत नाही. सिडको वसाहतींमध्ये पाण्याविना राहणे कठीण झाले आहे. त्यापेक्षा करंजाडे येथील सदनिका विकून भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी घर घेणे हाच एक पर्याय राहिला आहे. -चंद्रकांत गुजर, अध्यक्ष, करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स असोसिएशन

Story img Loader