नवी मुंबई – सोमवारी सकाळी १० ते मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखले येथील पनवेल कर्जत येथील दुहेरी रेल्वे मार्गाकरीता जलवाहिनी स्थलांतरीत करणे व कळंबोली येथे एक्सप्रेस पुलाकाळी दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील लाईन क्रॉसिंग करून जलवाहिनी टाकण्यासाठीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा या मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची महत्वाची कामे करणे अत्यावश्यक असल्याने सोमवारी सकाळी १० ते मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या देखभालीच्या कामामुळे मंगळवारी संध्याकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी या दोन दिवसांत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे.

Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
Change in traffic route due to Rath Yatra after ram navami in nashik
नाशिक : रथयात्रेमुळे वाहतूक मार्गात बदल
water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
no water supply in most parts of Pune city on thursday due to repair works
पुणे : शहरात अघोषित पाणीकपात? पेठांचा भागवगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

हेही वाचा – नवी मुंबई : हापूसची आवक घटली, इतर राज्यांतील आंब्याची आवक वाढली

हेही वाचा – टेम्पो सोडवण्याची लाच मागणारे ४ वाहतूक पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

देखभाल दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामामुळे सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा बंद राहणार असून, मंगळवारीही संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा व पालिकेला सहकार्य करावे, असे मोरबे प्रकल्प, कार्यकारी अभियंता, अरविंद शिंदे म्हणाले.